For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लॉटरीत मिळाला 50 कोटीचा महाल

06:06 AM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
लॉटरीत मिळाला 50 कोटीचा महाल
Advertisement

पूर्वी एका कारणामुळे दिला होता नकार

Advertisement

कुणाचे नशीब कधी अन् कसे उजळेल हे काही सांगता येत नाही. ब्रिटनच्या एका 72 वर्षीय महिलेसोबत असेच घडले आहे. तिने केवण् 15 पाउंडमध्ये लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते आणि इनामादाखल सुमारे 40 लाख पाउंड म्हणजेच 50 कोटी रुपयांचा आलिशान महाल जिंकला आहे. प्रथम इनाम जिंकल्याचे कळल्यावर तिने ते स्वीकारण्यास नकार दिला होता.

प्रथम या महिलेला आपण अश्व जिंकलो आहोत असे वाटले होते. हे पूर्ण प्रकरण बिटनच्या कॉर्नवालचे आहे, तेथे 72 वर्षीय मेरी डिक्सन यांनी ऑनलाइन लॉटरीत एक आकर्षक 4 बेडरुम असलेला समुद्र किनाऱ्यावरील महाल जिंकला होता. जेव्हा तिला इनाम दाखविण्यासाठी नेण्यात आले,तेव्हा मैदानात उभ्या एक घोड्याला पाहून हेच आपले इनाम असल्याचे तिला वाटले होते.

Advertisement

 इनाम नको

मेरी स्कॉटलंडच्या दक्षिण-पश्चिम हिस्स्यातील कॅसल डगलस येथील रहिवासी आहेत. लॉटरी आयोजक कंपनीने मी काय जिंकले हे त्वरित सांगणे टाळले होते. याऐवजी मला एका ‘रिविल’ लोकेशनवर नेण्यात आले होते. तेथे पहिल्यांदाच माझे इनाम दाखविले जाणार होते. मी तेथे पोहोचल्यावर पहिल्या नजरेत मैदानात उभ्या असलेल्या घोड्याला पाहिले. हेच लॉटरीत जिंकलेले इनाम असावे असे मला वाटले. मी त्यावेळी थँक्यू, परंतु हे नको असे म्हटले होते. परंतु काही क्षणांनी घोडा नव्हे तर एक आलिशान घर जिंकल्याचे कण्ले. यानंतर त्वरित माझा निर्णय बदलला असे मेरी यांनी सांगितले आहे.

केवळ 15 पाउंडमध्ये जिंकले कोट्यावधींचे घर

मैरी यांनी ज्या लॉटरीच्या तिकीटातून हे इनाम जिंकले, त्याची किंमत केवळ 15 पाउंड होती, भारतीय चलनात ही रक्कम सुमारे 1700 रुपयांच्या आसपास आहे. याच्या बदल्यात त्यांना कॉर्नवालमध्ये सुमारे 40 लाख पाउंडची लक्झरी प्रॉपर्टी मिळाली आहे. हे घर समुद्राच्या अत्यंत नजीक असून येथुन आकर्षक सागरी दृश्य दिसते. याचबरोबर त्यांना 2.5 लाख पाउंड रोख आणि सुमारे 2 लाख पाउंडचे फर्निचर प्राप्त झाले आहे. या मालमत्तेवर कुठलेच कर्ज नाही आणि स्टॅम्प ड्युटी आणि कायदेशीर खर्चही भागविण्यात आले आहेत. म्हणजेच मेरी आणि त्यांचा पती जॉन यांना घरासाठी कर्ज घेणे किंवा अतिरिक्त मोठ्या खर्चाची चिंता करावी लागणार नाही.

घरात अनेक सुविधा

मेरी यांना प्राप्त घर एखाद्या लक्झरी रिसॉर्टपेक्षा कमी नाही. या चार बेडरुम्स असलेल्या घराला समुद्राच्या सुंदर दृश्यांना विचारात घेत डिझाइन करण्यात आले आहे. घरात फ्लोर-टू-सीलिंग विंडो आहे, यातून बाहेरील सागरी दृश्य स्पष्टपणे दिसते. चारही बेडरुम डबल साइजचे असून तीन खोल्यांसोबत ड्रेसिंग रुम देखील आहे. सर्व बेडरुम्समध्sय अटॅच्ड बाथरुम आहे. वरच्या मजल्यावर मोठे ओपन-प्लॅन किचन, डायनिंग आणि लिव्हिंग एरिया आहे. याचबरोबर स्टडी, कंजर्वेटरी, बूट रुम आणि युटिलिटी रुम देखील आहे. घराबाहेर हीटेड आउटडोअर स्वीमिंग पूल आहे, यात स्वीम-अप बार, बसण्याची खास जागा आणि फायर पिट देखील आहे. मोठ्या गार्डनसोबत आउटडोअर किचन देखील आहे. यात बार्बेक्यू आणि पिझ्झा ओवन लावण्यात आलेला आहे. प्रॉपार्टीत तीन कार्ससाठी गॅरेज आणि एक प्रायव्हटेट ड्राइववे देखील आहे.

समुद्रकिनारी महाल

हे आलिशान घर कॉर्नवालच्या लिजार्ड पेनिनसुला येथे आहे. येथून समुद्र किनाऱ्यावर काही क्षणात पायी चालत जाता येऊ शकते. फालमाउथ सुमारे 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. जेथे समुद्र किनारी रेस्टॉरंट आणि आर्ट गॅलरी आहे. तर रेडरथ सर्वात नजीकचे मेनलाइन रेल्वेस्थानक आहे. जेथून लंडन पॅडिंग्टनसाठी थेट रेल्वेसेवा उपलब्ध आहे. मेरी आणि त्यांच्या पतीसाठी हे घर त्यांच्या जुन्या जीवनापेक्षा खूपच वेगळे आहे.

जुने घर स्कॉटलंडमध्ये

मेरी आणि त्यांचे पती 2000 सालापासून स्कॉटलंडच्या कॅसल डग्लसमध्ये एका टेरेस्ड हाउसमध्ये राहत आहेत. आमचे जुने घर बहुधा नव्या घराच्या ड्राइव्हवेच्या टर्निंग सर्कलमध्येच सामावेल असे मजेशीर वक्तव्य त्यांनी केले आहे. मेरीअ ाणि जॉन सुमारे 20 वर्षांपूर्वी कॉर्नवालमध्ये फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी दोघांनी समुद्र किनारी वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल्समध्ये राहून प्रवास केला होता. पुढील वेळी जेव्हा आम्ही कॉर्नवालमध्ये परतू तेव्हा आमचे स्वत:चे 40 लाख पाउंडचे घर असेल असा विचारही कधी केला नव्हता असे मेरी यांनी म्हटले आहे.

लॉटरी कशी काढली?

मेरी यांनी अचानक लॉटरीत सामील होण्यास सुरुवात केली नव्हती. एका सहकाऱ्याने 2023 मध्ये लेक डिस्ट्रिक्टमध्ये एक घर जिंकल्यावर त्यांनी लॉटरी खरेदी करण्यास सुरुवात केली होती. या लॉटरीत खरोखरच सामान्य लोक विजयी होऊ शकतात असे त्यांना वाटले होते.

फोनही जवळपास मिस केला होता

मेरी यांच्या कहाणीत आणखी रंजकदार वळण आहे. लॉटरी कंपनीच्या टीमने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न चालविला होता. परंतु मेरी यांनी प्रारंभी त्यांचे फोन स्वीकारले नव्हते. एक तर त्यावेळी मोबाइल नेटवर्क नव्हते आणि दुसरे कारण म्हणजे त्या अनोळखी क्रमांकावरून येणारे कॉल सर्वसाधारणपणे रिसीव्ह करत नव्हत्या. नंतर कंपनीने त्यांना मेसेज केला. मेरी यांनी ऑनलाइन कंपनीविषयी माहिती तपासली आणि तेव्हा हे प्रकरण खरे असल्याचा विश्वास त्यांना झाला. त्यानंतर त्यांनी कंपनीला कॉल केला होता.

परिवारासोबत साजरा करणार नाताळ

मेरी आणि त्यांचे पती जॉन सध्या या घराला विकणे किंवा त्वरित कुठलाही मोठा निर्णय घेण्याच्या मूडमध्ये नाहीत. काही काळ हे घर स्वत:कडे राखून आनंद घेऊ इच्छितो. नव्या घरात पूर्ण परिवार एकत्र यावा आणि येथे नाताळ साजरा करावा अशी त्यांची योजना आहे. मेरी यांच्यानुसार हे घर आमच्या पूर्ण परिवाराच्या भविष्यावर प्रभाव पाडणार आहे. मेरी आणि जॉन 1996 पासून एकत्र आहेत आणि 2017 मध्ये त्यांनी विवाह केला होता. मेरी यांनी सार्वजनिक क्षेत्रात 34 वर्षे काम केले आहे. तर जॉन यांनी 27 वर्षे स्टीलवर्क्समध्ये ड्राफ्ट्समॅन म्हणून काम केले आहे. नंतर त्यांनी फायर अँड रेस्क्यू सर्व्हिसमध्ये नोकरी केली आणि 2011 साली निवृत्त झाले. मेरी यांना दोन मुली होत्या, ज्यातील एकीचे निधन झाले आहे. त्या स्वत:च्या दिवंगत मुलीचे 17 आणि 22 वर्षीय मुलगे म्हणजेच स्वत:च्या नातवांशी जवळीक ठेवून आहेत.

Advertisement
Tags :

.