For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

A आणि B श्रेणीतील हॉटेल्सना 5 वर्षांची नोंदणी देण्याचा प्रस्ताव; पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची माहिती

02:59 PM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
a आणि b श्रेणीतील हॉटेल्सना 5 वर्षांची नोंदणी देण्याचा प्रस्ताव  पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची माहिती
Advertisement

पणजी : गोव्यातील हॉटेल व्यवसायातील नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने A आणि B श्रेणीतील हॉटेल्सना 5 वर्षांसाठी नोंदणी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. मात्र, या कालावधीत हॉटेल्सना दरवर्षी आवश्यक नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. पर्यटन विभागाच्या नोंदणी प्रक्रियेत अग्निसुरक्षा आणि इतर आवश्यक परवानग्यांना महत्त्व आहे.

Advertisement

प्रस्तावित व्यवस्थेनुसार, हॉटेल्सकडून फायर सेफ्टीसह आवश्यक वार्षिक अनुपालन पूर्ण केले जात आहे की नाही, याची खातरजमा केली जाणार आहे. अग्निसुरक्षा नियमांनुसार आवश्यक ठिकाणी वैध फायर एनओसी आणि सुरक्षा व्यवस्था कायम ठेवणे बंधनकारक आहे.

हॉटेल नोंदणीच्या नूतनीकरणासाठीची प्रक्रिया अधिक वेगवान करण्याचाही प्रस्ताव आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास नोंदणी मंजूर झाल्याचे गृहीत धरण्याची तरतूद करण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

दरम्यान, पर्यटन विभागाच्या पथकांनी कळंगुट, कांदोळी, मोरजी आणि आश्वे परिसरातील हॉटेल्स आणि पर्यटन व्यवसायांची पाहणी केली. या तपासण्यांमध्ये काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन आढळल्याची माहिती देण्यात आली. विभागाकडून नोंदणीची वैधता आणि पर्यटनविषयक नियमांचे पालन याबाबत तपासणी सुरू आहे.

गोवा सरकारच्या पर्यटन विभागानुसार, राज्यातील हॉटेल्ससह पर्यटन व्यवसायांशी संबंधित आस्थापनांना Goa Registration of Tourist Trade Act अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे.

Advertisement
Tags :

.