महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कलंगुट बीचवरील बोट दुर्घटनेत सातोसे येथील सूजन बनले देवदूत

03:30 PM Dec 26, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

५ पर्यटकांना मृत्यूच्या दाढेतून आणले परत

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

बुधवारी गोव्यातील कलंगुट बीचवर बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर बारा जण बचावले. यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील सातोसे येथील सुपुत्र व कलंगुट बीचवर सेवा बजावणारा लाईफ गार्ड कॅप्टन सुजन नागवेकर हा या पर्यटकांसाठी देवदूत बनला. पाण्यात गटांगळ्या खाणाऱ्या तब्बल पाच जणांना त्यांनी पाण्याच्या बाहेर काढत त्यांना जीवदान दिले. यातील पाच व सहा वर्षीय दोन मुलांना तर सुजन याने अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.गोवा आणि ३१ डिसेंबर यांच्या संबंधापासून सर्व परिचित आहेतच. ३१ डिसेंबर जसजसा जवळ येत असतो, तस तसा गोव्याकडे येणारा देशी विदेशी पर्यटकांचा ओढा वाढत असतो. यात काहीवेळा पर्यटकांच्या बेफिकिरी आणि अतिउत्साहिपणामुळे अनुचित घटना घडत असतात. गोव्यात समुद्रकिना-यांवर तर अक्षरशः पर्यटकांच्या कुंभमेळ्यात गोव्याचे लाइफ गार्ड्स डोळ्यात तेल घालून आपले कर्तव्य बजावत अनेक पर्यटकांचे लाखमोलाचे जीव वाचवत असतात. अशाच एक प्रसंगात गोव्यातील सगळ्यात हॉटस्पॉट समजल्या जाणाऱ्या समुद्रकिना-याच्या कलंगुट ओशयानिक 22 पॉइंट येथे बोट उलटून बुडणा-या पर्यटकाला वाचवण्यात लाईफ गार्ड कप्तान सुजन सीताराम नागवेकर याने महत्वाची भूमिका पार पाडली. मूळ खेड रत्नागिरी येथील व कामानिमित्त मुंबई..कुर्ला येथे वास्तव्यास असलेले पोफळकर कुटुंब पर्यटनासाठी गोव्यात आले होते. कलंगुट बीचवर पर्यटन सफरचा आनंद लुटताना वाऱ्याच्या वेगामुळे बोट अचानक उलटली. यातील दोन मुले व एक तरुण बाहेर समुद्रात फेकला गेला. लाइफ गार्ड कॅप्टन सुजन नागवेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जीवाची पर्वा न करता तात्काळ समुद्राच्या दिशेने धाव घेत बुडणाऱ्या पर्यटकांना बाहेर काढले.प्रसंगावधान राखून वेळेत दिलेल्या प्रथमोपचार आणि सी.पी.आर. मुळे ५ वर्षीय विहान पोफळकर व व सहा वर्षीय शौर्य पोफळकर या दोन्ही मुलांना मृत्युच्या दाढेतुन बाहेर काढून जीवदान दिले.सुजन नागवेकर हा सातोसे येथील स्थानिक युवक असून गेली बरीच वर्षे गोवा येथील मोक्याच्या समुद्रकिनारी लाइफ गार्ड कप्तान म्हणून पेट्रोलिंग साठी तैनात असतो. आतापर्यंत ५० पेक्षा जास्त पर्यटकांना जीवदान देण्याचे पुण्यकर्म सुजनने करुन दाखवले आहे. सूजनच्या या कार्याचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Advertisement
Tags :
# tarun Bharat sindhudurg # news update
Next Article