महाकुंभमेळ्याला जाताना बिदरच्या 5 जणांचा मृत्यू
सात जण गंभीर जखमी : उत्तर प्रदेशमधील वाराणसीजवळ घटना
प्रतिनिधी/ बेंगळूर
बिदरमधील एकाच कुटुंबातील 12 सदस्य प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी जात होते. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. सुनीता (वय 40), निलम्मा (वय 62), लक्ष्मी (वय 57), कलावती (वय 60), संतोष (वय 45) अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण बिदर शहरातील लाडगेरी वसाहतीतील रहिवासी आहेत.
उत्तर प्रदेशातील वाराणसीजवळ हा अपघात झाला. या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना स्थानिक ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लाडगेरीनगर येथील रहिवासी असलेले 14 जण 18 फेब्रुवारी रोजी दुपारी बिदर येथून क्रूझरने महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला निघाले होते. मिराजापूर जिल्ह्यातील ऊपापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या लॉरीला शुक्रवारी सकाळी क्रूझरची धडक बसली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत.