For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कलबुर्गी जिल्ह्यात अपघातात एकाच कुटुंबातील 5 जण ठार

06:42 AM May 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
कलबुर्गी जिल्ह्यात अपघातात  एकाच कुटुंबातील 5 जण ठार
Five family members were killed on the spot after a Force Cruiser vehicle collided head-on with a lorry on National Highway 150 near Ladlapur village in Chittapur taluk, Kalaburagi district on Friday night. -KPN ### Chittapur road accident 5 killed
Advertisement

बेंगळूर :

Advertisement

कलबुर्गी जिल्ह्यात व्रूझर आणि ट्रक यांची समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाचजण जागीच ठार झाले. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी मध्यरात्री चित्तापूर तालुक्यातील लाडलापूरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 150 वर घडली.

मृतांमध्ये मोहम्मद हुसेन शहा (वय 60), फातिमा अली (वय 38), रसूल बी. (वय 40), मेहबूब अली आणि व्रूझर चालक तोलूसाब पाशा (वय वय 24) यांचा समावेश आहे. ते सर्वजण चित्तापूर तालुक्यातील इंगळगी गावचे रहिवासी आहेत.

Advertisement

घटनेविषयी अधिक माहिती अशी, मोहम्मद अब्दुलसाब नामक व्यक्तीला रात्री अर्धांगवायूचा झटका आल्याने त्याला यादगीर येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी आठजण व्रूझरमधून गेले होते. रात्री 11:40 वाजता ते मोहम्मदला रुग्णालयात दाखल करून परत निघाले. दरम्यान, लाडलापूरजवळ महामार्गावर तामिळनाडू नोंदणीचा ट्रक आणि क्रूझर यांची समोरासमोर धडक बसली. या अपघातात क्रूझरमधील पाचजणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात क्रूझरचा चक्काचूर झाला. वाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

Advertisement
Tags :

.