मित्रपक्षांमधील जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे 5 सदस्यीय पॅनेल
काँग्रेसने आज मंगळवारी 2024 च्या संसदीय निवडणुकीसाठी इंडिया आघाडी मधील मित्रपक्षांशी जागा वाटप करण्यासाठी पाच वरिष्ठ नेत्यांचा समावेश असलेली पाच सदस्यीय राष्ट्रीय आघाडी समिती (एनएसी) जाहीर केली आहे. या समितीमध्ये मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली अशोक गेहलोत आणि भूपेश बघेल हे दोन माजी मुख्यमंत्री, तर माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद आणि ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांचा समावेश आहे.
वेणुगोपाल यांनी समितीची घोषणा मंगळवारी दिल्लीत इंडिया आघाडीची चौथी बैठक सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, "सार्वत्रिक निवडणुका-2024 च्या पार्श्वभुमीवर माननीय काँग्रेस अध्यक्षांनी खालीलप्रमाणे, तत्काळ प्रभावाने राष्ट्रीय आघाडी समिती स्थापन केली आहे." पॅनेलमध्ये पक्षाच्या पाच वरिष्ठ नेत्यांचा समावेशाने मित्रपक्षांसोबत जागा वाटपाच्या अवघड मुद्द्यावर वाटाघाटी करण्यास मोकळा हात दिला जाण्याची शक्यता आहे.