महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आंध्रातील अट्टल घरफोड्याला अटक करून 5 लाखाचा ऐवज जप्त

10:49 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

टिळकवाडी पोलिसांची कारवाई

Advertisement

बेळगाव : एका अट्टल घरफोड्याला अटक करून त्याच्याजवळून 5 लाख 12 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. टिळकवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राजू सॅमसन उप्पलपाटी (वय 51) मूळचा रा. मोनकपाळ, ता. पोदली, जि. प्रकाशम, आंध्रप्रदेश, सध्या रा. ब्रह्मानंद कॉलनी, गणेशपूर असे त्याचे नाव आहे. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवार दि. 1 फेब्रुवारी रोजी ही कारवाई केली आहे. 24 जानेवारी रोजी टिळकवाडी पोलीस स्थानकात एक चोरी प्रकरण नोंद झाले होते. ज्योती जगदीश इळगेर, रा. झेनिथ अपार्टमेंट, लोटस कौंटी, मंडोळी रोड यांनी फिर्याद दिली होती. दि. 7 ते 24 जानेवारीपर्यंत घरात कोणी नसताना बाराव्या मजल्यावरील फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून 77 ग्रॅम सोन्याचे दागिने, 550 ग्रॅम चांदीचे दागिने असे 4 लाख 12 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज पळविण्यात आला होता. या प्रकरणी राजू उप्पलपाटी याला अटक करून त्याच्याजवळून 77 ग्रॅम सोन्याचे दागिने, 555 ग्रॅम चांदी व डीएसएलआर कॅमेरा असा एकूण 5 लाख 12 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article