For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime : कोल्हापुरात दारु पिण्यास नकार दिल्यामुळे 5 गुंडांनी तरुणाची केली बेदम मारहाण

05:07 PM Feb 24, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   कोल्हापुरात दारु पिण्यास नकार दिल्यामुळे 5 गुंडांनी तरुणाची केली बेदम मारहाण
Advertisement

                                 शाहू नगरमध्ये 5 सराईत गुंडांनी तरुणावर दगडफेक व मारहाण

Advertisement

कोल्हापूर - मोक्यातून जामिनावर सुटलेल्या 5 सराईत गुंडाने व त्याच्या साथीदारांनी दारु पिण्यासाठी सोबत येण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणास बेदम मारहाण करत, आलिशान बाहनाची तोडफोड केली. शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास शाहूनगर येथील दत्त गल्लीमध्ये हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी चौघांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा - दाखल करण्यात आला.

याबाबतची फिर्याद जखमी साहिल काकासाहेब पाटील (वय २५ रा. शाहू नगर, दत्त गल्ली)दारु पिण्यास नकार दिल्याने तरुणास बेदम मारहाणमोटारीवर दगडफेक, सळीने हल्ला याने दिली असून यानुसार विशाल अविनाश माने उर्फ अज्या-लातूर (रा. दौलतनगर), मोक्यातील जामिनावर सुटलेला अमित सुरेश दिंडे (रा. हनुमाननगर, उजळाईवाडी), करण विनायक पिसाळ (रा. प्रतिभानगर), प्रतिक साळुंखे (रा. दत्त गल्ली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास साहिल हा घराच्या दारात थांबला होता. यावेळी करण पिसाळ व विशाल माने दुचाकीवरुन साहिल जवळ आले. त्याला दारु पिण्यास येण्यास सांगितले. मात्र साहिलने त्यास नकार दिला व तो घरी निघून गेला. याचाच राग मनात धरुन शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास साहिल मोबाईल मिळत नसल्याने चांदीच्याचौघेही सराईत गुंड विशाल माने, अमित दिंडे, करण पिसाळ, प्रतिक साळुंखे हे चौघेही सराईत गुंड आहेत. विशालबर खुनाचा प्रयत्न, मारामारीसह ४ गुन्हे दाखल आहेत. तर अमित दिंडे याच्यावर खून मारामारी गंभीर गुन्हे दाखल आहेत.

गणपती येथे आला होता. यावेळी दोन दुचाकीवरुन विशाल, करण, अमित, प्रतिक आले. त्यांनी साहिलला मारहाण करत दारात लावलेल्या आलिशान मोटारीबर दगडफेक करत सळीने मोटारीबर हल्ला केला. यामुळे परिसरातील नागरीक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनाही दमदाटी करुन हल्लेखोर पसार झाले. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली.

Advertisement
Tags :

.