5 दिवसांच्या शेअरबाजाराच्या घसरणीला विराम
सेन्सेक्स 498 अंक वधारला : आयटीसी समभाग चमकले
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारातील मजबुतीचा लाभ भारतीय शेअरबाजाराने सोमवारी उठवल्याचे पहायला मिळाले. गेल्या आठवड्यात सलग पाच दिवस शेअरबाजारात घसरण राहिली होती. एफएमसीजी कंपनी आयटीसीचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले होते. धातू आणि फायनॅन्शीयल क्षेत्रांच्या सकारात्मक कामगिरीचा बाजाराला लाभ झाला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 498 अंकांनी वाढत 78540 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 165 अंकांनी वाढत 23753 अंकांवर बंद झाला. सोमवारी सेन्सेक्समध्ये 900 अंकांपर्यंत तेजी पहायला मिळाली. निफ्टीतील 39 कंपन्यांचे समभाग तेजीत तर 11 समभाग घसरणीसह बंद झाले.
हे समभाग वधारले
सेन्सेक्समधील आयटीसीचा समभाग 2 टक्के वाढत बंद झाला. यासोबत टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रिज, इंडसइंड बँक, टायटन, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, अदानी पोर्टस्, भारती एअरटेल, अॅक्सिस बँक यांचे समभागही सकारात्मक कामगिरी करत बंद झाले.
हे समभाग घसरले
दुसरीकडे झोमॅटोचे समभाग सर्वाधिक घसरलेले दिसले. याशिवाय ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकी, एचसीएल टेक, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, एशियन पेंटस् व टीसीएस यांचे समभाग सुद्धा घसरणीत राहिले होते.
विविध निर्देशांकावर नजर टाकल्यास धातु आणि फायनॅन्शीयल निर्देशांक चमकताना दिसले. धातू निर्देशांक सुरुवातीला 1.3 टक्के इतका वाढला होता. जेएसडब्ल्यू स्टीलचा समभाग सुरुवातीला 3.2 टक्के वाढला होता. टाटा स्टीलचा समभागही त्याचवेळी 2 टक्के वाढला होता. यासोबत सेलचा समभाग 2 टक्के वाढलेला दिसला.
झोमॅटोची सेन्सेक्समध्ये एंट्री
याचदरम्यान सोमवारी झोमॅटोचे समभाग बीएसई सेन्सेक्समध्ये समाविष्ट झाले.