For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

5 कोटी लोक पोहोचणार अयोध्येत

06:23 AM Jan 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
5 कोटी लोक पोहोचणार अयोध्येत
Advertisement

85 हजार कोटींमध्ये होणार रामनगरीचा कायापालट

Advertisement

राम मंदिराचे उद्घाटन हे एकीकडे लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू होता, तर अयोध्येत 85 हजार कोटी रुपयांच्या निधीतून झालेला कायापालट आता आर्थिक प्रभाव निर्माण करणार आहे. ग्लोबल ब्रोकरेज हाउस जेफरीजने  राम मंदिरासंबंधी अहवाल जारी करत अयोध्या आता भारताच्या पर्यटनक्षमतेला अनलॉक करू शकते असे नमूद पेले आहे.

जेफरीजने अहवालात राम मंदिरामुळे होणाऱ्या आर्थिक प्रभावाविषयी विस्तृत तपशील दिला आहे. अयोध्येत झालेला बदल आणि राम मंदिर दरवर्षी 5 कोटीहून अधिक पर्यटकांना स्वत:कडे आकर्षित करणार आहे. राम मंदिर एक सार्थक स्वरुपात मोठा आर्थिक प्रभाव निर्माण करू शकते. अयोध्येत अनेक एअरलाइन्सनी स्वत:ची विमानसेवा सुरू केली आहे. इंडियन हॉटेल्स लिमिटेड समवेत अनेक कंपन्यांनी स्वत:चे प्रकल्प सुरू केले आहेत.

Advertisement

85 हजार कोटींचे प्रकल्प

प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जेफरीजने स्वत:चा अहवाल सादर केला आहे. अयोध्येचे राम मंदिर एक मोठ्या आर्थिक प्रभावासोबत येते, कारण भारताला एक नवे धार्मिक पर्यटनाचे स्थळ मिळाले आहे. येथे दरवर्षी 5 कोटी भाविक आणि पर्यटक अयोध्येत पोहोचणार आहेत. 85 हजार कोटी रुपयांच्या निधीतून अयोध्येचा कायापालट करण्यात आला असून त्यात नवे विमानतळ, आधुनिक रेल्वेस्थानक, वसाहत, उत्तम रस्तेसंपर्क प्रकल्प सामील आहेत.

दरदिनी लाखो भाविक येणार

सुमारे 70 एकरमध्ये फैलावलेले मुख्य तीर्थस्थळ सुमारे 10 लाख भाविकांना एकाचवेळी सामावून घेऊ शकते. दरदिनी येथे पोहोचणाऱ्या भाविकांची संख्या 1-1.5 लाखापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. देशातील अनेक लोकप्रिय धार्मिक केंद्रं पुरेशा मूलभूत सुविधा नसतानाही सुमारे 3  कोटी भाविकांना आकर्षित करतात आणि आता उत्तम संपर्क यंत्रणा आणि मूलभूत सुविधांसोबत नवे धार्मिक केंद्र अयोध्येची उभारणी करण्यात आल्याने या क्षेत्रात मोठी तेजी येणार आहे.

जग अलौकिक होण्याचे पर्व सुरू

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर स्वामी गोविंद देवगिरी महाराजांच्या हातातून चरणामृत ग्रहण करत पंतप्रधान मोदींनी 11 दिवसांचा उपवास सोडला आहे. पंतप्रधान मोदींचा तप हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तपासमान असल्याचे उद्गार गोविंद देव गिरि यांनी काढले आहेत. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे जग अलौकिक होण्याचे पर्व सुरू झाले आहे. हे एक मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचे पर्व नसून एक देश आत्मसन्मान, स्वाभिमान आणि गर्वाने प्रतिष्ठित होण्याचे पर्व आहे. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होऊ शकली आहे. अशाप्रकारच्या कार्यासाठी प्रत्येक कालखंडात महान व्यक्तीचे आगमन होत असते. अशाप्रकारचे लोक साधना करत देशाला दिशा देतात. देशाला पंतप्रधान मोदींसारखा राजर्षी प्राप्त झाला असल्याचे उद्गार निर्मोही आखाड्याचे संत गोविंद गिरि यांनी काढले आहेत.

Advertisement
Tags :

.