महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रशासकीय-वकील चेंबरसाठी 5 तर कॅन्टीनसाठी 2 कोटी मंजूर

06:16 AM Sep 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

न्यायालय आवारात होणार प्रशासकीय इमारत व वकिलांसाठी चेंबर, जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात लवकरच कॅन्टीन

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये वकिलांसाठी आणखी एका चेंबरची इमारत बांधावी, अशी मागणी करण्यात येत होती. याचबरोबर जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात कॅन्टीनदेखील उभे करावे, यासाठी प्रयत्न सुरू होते. त्याला यश आले असून सध्या जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये प्रशासकीय इमारत आणि वकील चेंबरसाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत. कॅन्टीनसाठी 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच या कामाला सुरुवात केली जाईल, असे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर यांनी सांगितले.

जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये सध्या वकिलांसाठी एक चेंबर आहे. त्याठिकाणी काही वकिलांना चेंबर देण्यात आले आहे. मात्र अजूनही काही वकिलांना चेंबरची गरज आहे. त्यासाठी सरकारकडे तसेच उच्च न्यायालयाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. गेल्या 10 वर्षांपासून हे प्रयत्न सुरू होते. अखेर सरकारकडून सार्वजनिक बांधकाम खात्याला प्रशासकीय इमारत आणि चेंबर बांधणीसाठी 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

सध्या असलेल्या वकील चेंबरला लागूनच ही इमारत होणार आहे. त्या इमारतीमध्ये प्रशासकीय कार्यालय आणि 83 चेंबर बांधले जाणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष किवडसण्णावर यांनी दिली. सध्या पाच कोटी मंजूर झाले असून आणखी 5 कोटी पुढील वर्षी मंजूर होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी रायबाग आणि चिकोडी येथील न्यायालयीन इमारती व इतर इमारतींसाठी सरकारने निधी दिला होता. त्यानंतर आता बेळगाव न्यायालयासाठी हा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

कॅन्टीनसाठीही 2 कोटी रुपये मंजूर

जेएमएफसी न्यायालयाच्या आवारामध्ये आधुनिक कॅन्टीन बांधण्याचा प्रस्ताव 10 ते 12 वर्षांपूर्वीच पाठविण्यात आला होता. त्याला त्यावेळी मंजुरी मिळाली. त्यामुळे जुने कॅन्टीन पाडविण्यात आले होते. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे कॅन्टीनची इमारत बांधण्याचे काम रेंगाळले होते. आता त्या कॅन्टीनसाठीही 2 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्या कामालाही लवकर सुरुवात होणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

महिलांसाठी शौचालय बांधणे गरजेचे

न्यायालयामध्ये विविध समस्या भेडसावत आहेत त्या दूर करण्यासाठी बार असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. महिलांसाठी शौचालय बांधणे गरजेचे आहे, त्यासाठीही पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या दोन्ही कामाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच या कामांना सुरुवात होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article