For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आप’चे 5 नगरसेवक भाजपमध्ये दाखल

06:51 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘आप’चे 5 नगरसेवक भाजपमध्ये दाखल
Advertisement

विधानसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांना मोठा धक्का 

Advertisement

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला निवडणुकीच्या धामधुमीत मोठा झटका बसला आहे. ‘आप’च्या 5 नगरसेवकांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुढील वषी दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी आपसोबतच भाजपही निवडणुकीच्या पूर्वतयारीत सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत मनिष सिसोदिया पायी चालत थेट दिल्लीतील जनतेशी संवाद साधत आहेत. तर दुसरीकडे पक्ष फोडाफोडीचे राजकारणही सुरू झाले आहे. याचदरम्यान आम आदमी पक्षाच्या 5 नगरसेवकांनी पक्ष बदलून भाजपमध्ये प्रवेश केला.

Advertisement

बवाना येथील दोन नगरसेवकांसह बरदपूर बॉर्डर, तुघलकाबाद येथील प्रत्येकी एका नगरसेवकाने पक्ष बदलून भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत तळागाळात काम करणाऱ्यांमध्ये नगरसेवकांचाही समावेश आहे. वास्तविक, नगरसेवक प्रभाग स्तरावर लोकांसाठी काम करत असताना त्यांचा थेट जनतेशी संवाद असतो. निवडणुकांमध्ये सर्वसामान्यांशी थेट नाळ जोडलेली असते. अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी पाच नगरसेवकांनी पक्ष बदलल्यामुळे केजरीवाल यांच्या पक्षाला नुकसान संभवू शकते.

दिल्लीत निवडणुकीची तयारी जोरात

दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांच्यासह संजय सिंह आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. संजय सिंह आणि मनीष सिसोदिया यांना न्यायालयातून जामीन मिळाला आहे, तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अजूनही तुऊंगात आहेत. सिसोदिया आणि संजय सिंह यांची तुऊंगातून सुटका झाल्यानंतर दिल्लीत आम आदमी पक्षाच्या निवडणुकीच्या हालचाली वाढल्या आहेत. तुऊंगातून सुटल्यानंतर मनीष सिसोदिया सातत्याने दिल्लीतील विविध भागात पायी पदयात्रा करत जनतेशी संवाद साधत आहेत. दुसरीकडे, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनेही तयारी सुरू केली आहे. भाजपने यासाठी मास्टरप्लॅनही तयार केला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षातील तीन दिग्गज नेत्यांना विशेष सूचना दिल्याचे समजते.

Advertisement
Tags :

.