कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कूनोमध्ये ‘मुखी’कडून 5 बछड्यांना जन्म

07:00 AM Nov 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रोजेक्ट चित्ताला भरीव यश 

Advertisement

वृत्तसंस्था/भोपाळ

Advertisement

मध्यप्रदेशच्या कूनो राष्ट्रीय अभयारण्यात भारतीय वंशाची मादी चित्ता ‘मुखी’ने 5 बछड्यांना जन्म दिला आहे. मुखी चित्ता आणि तिचे सर्व बछडे पूर्णपणे तंदुरुसत असल्याचे कूनो व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. ही घटना ऐतिहासिक ठरली आहे, कारण पहिल्यांदाच भारतात जन्मलेल्या मादी चित्त्याने देशातच यशस्वी प्रजनन केले आहे.

सुमारे 33 महिन्यांपूर्वी कूनोमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणले गेलेल्या चित्त्याने 3 बछड्यांना जन्म दिला होता, त्यातील 2 बछड्यांचा मृत्यू झाला होता. तर केवळ मुखी जिवंत राहिली होती. मुखीची प्रकृती सुधारेपर्यंत कूनोचे वनकर्मचारी तिच्यावर दिवसरात्र नजर ठेवून असायचे. हळूहळू मुखीने स्वत:चा चिवटपणा दाखवत शिकार करणे, स्वत:च्या क्षेत्राची ओळख पटविणे, हवामान आणि भौलोगिल क्षेत्राबद्दल अनुकूलन क्षमता दाखविली होती.

पूर्णपणे भारतीय भूमीच्या स्थितीत मोठी झाली असल्याने मुखी अन्य चित्त्यांच्या तुलनेत अधिक मजबूत व्यवहारिक शिकवण घेऊन वावरत होती. हेच स्थानिक अनुकूलन तिला पहिल्या यशस्वी भारतीय मूळ असलेला प्रजननक्षम चित्ता ठरविण्यास सहाय्यभूत ठरल्याचे तज्ञांचे मानणे आहे.

मुखीकडून 5 बछड्यांना जन्म हा कूनोचा अधिवास, अन्नसाखळी, पर्यावरण आणि सुरक्षाव्यवस्था चित्त्यांसाठी अत्यंत अनुकूल ठरल्याचा पुरावा आहे. वन्यजीव तज्ञांनुसार हे एक स्वाभाविक प्रजनन असून ते कुठल्याही पुनर्वसन प्रकल्पाचा सर्वात कठिण आणि सर्वात महत्त्वपूर्ण निकष असतो. ही कामगिरी भारत आता आत्मनिर्भर चित्ता संख्येच्या लक्ष्याच्या अत्यंत नजीक असल्याचे संकेत देते. यामुळे आनुवांशिक विविधता वाढेल, भविष्याच्या चित्ता पिढ्यांसाठी मजबूत आधार तयार होईल आणि जागतिक वन्यजीव संरक्षणात भारताची स्थिती आणखी मजबूत होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article