महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युएईसोबत भारताचे 5 करार

06:57 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

युएईचे युवराज भारत दौऱ्यावर : द्विपक्षीय संबंध होणार मजबूत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

संयुक्त अरब अमिरातचे (युएई) युवराज शेख खालिद बिन जायद अल नाहयान हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अल नाहयान यांच्यासोबत व्यापक चर्चा केली आहे. तसेच दोन्ही देशांनी समग्र रणनीतिक संबंधांना चालना देण्यावर लक्ष केंद्रीत करत ऊर्जा सहकार्य वाढविण्यासाठी सोमवारी 5 करारांवर स्वाक्षरी केली आहे. हे करार अणुऊर्जा आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्याशी संबंधित आहे. या करारांमुळे भारत-युएई संबंध मजबूत होणार असल्याचे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.

एमिरेट्स न्युक्लियर एनर्जी कंपनी (ईएनईसी) आणि न्युक्लियर पॉवर कोऑपरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल) दरम्यान बराख अणुऊर्जा प्रकल्प संचालन आणि देखभालीवरून करार झाला आहे. याचबरोबर अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी (एडीएनओसी) आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडदरम्यान दीर्घकाळापर्यंत एलएनजीच्या पुरवठ्यासाठी करार झाला आहे.  तसेच एडीएनओसी आणि इंडिया स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेडदरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

भारत आणि एडीएनओसी दरम्यान अबूधाबी ओमशोर ब्लॉक-1 साठी उत्पादन करार झाला आहे. तर भारतात फूड पार्कच्या विकासासाठी गुजरात सरकार आणि अबू धाबी विकास होल्डिंग कंपनी पीजेएससीदरम्यान करार झाला आहे.

पहिला अधिकृत भारत दौरा

युवराज म्हणून अल नाहयान यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. मंगळवारी अल नाहयान हे मुंबईतील एका बिझनेस फोरममध्ये सामील होणार आहेत. या कार्यक्रमात दोन्ही देशांचे अनेक उद्योजक भाग घेणार आहेत.

मोदी आणि अल नाहयान यांनी व्यापक रणनीतिक भागीदारीला बळ देण्याच्या उद्देशाने भारत आणि युएईदरम्यानच्या बहुआयामी संबंधांवर चर्चा केली आहे. भारत-युएई संबंधांमध्ये भरीव प्रगती होत असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी म्हटले आहे. मोदींसोबत चर्चा झाल्यावर अल नाहयान यांनी राजघाट येथे जात महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article