खून प्रकरणी ५ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
एकाच वेळी ५ जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
जिल्ह्यातील पहिलीच घटना
सांगली :
सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आग्रण धुळगाव येथे भरलेल्या जत्रेतील तमाशात वाद होऊन एका युवकाची हत्या झाली होती. या हत्येप्रकरणात आरोपी असलेल्या पाच जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच या खटल्यात प्रत्यक्ष मारेकऱ्यांसोबत सहभाग घेणाऱ्यांना देखील आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सांगली जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक ४ डी. वाय. गौड यांनी ही शिक्षा सुनावली आहे. आठ वर्षांनंतर कुटुंबाला न्याय मिळाला आहे.
२०१७ मध्ये कवठेमहांकाळच्या अग्रण धुळगाव येथे घडलेल्या खून प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील आग्रन धुळगाव या गावात जत्रा भरली होती. या जत्रेत रात्री आयोजित तमाशात काही जणांमध्ये वाद उद्भवला होता. या वादातून अशोक तानाजी भोसले या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. या खून खटल्याची सुनावणी २०१७ पासून सुरू होती.