For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भूखंड देण्याच्या आमिषाने 5.77 लाखांना घातला गंडा

02:36 PM Nov 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
भूखंड देण्याच्या आमिषाने 5 77 लाखांना घातला गंडा
Advertisement

मडगाव : भूखंड देतो सांगून 5 लाख 77 हजार रुपयांना गंडा घातलेल्या धनलक्ष्मीनगर- भाटले, पणजी येथील सादिक शेख याच्याविरुद्ध मडगाव पोलिसस्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या फसवणूक प्रकरणी घोगळ हाऊसिंग बोर्ड येथील मणिरुद्दीन खान यांनी मडगाव पोलिसस्थानकात तक्रार केलेली आहे. 15 फेब्रुवारी 2020 ते 15 मार्च 2020 या दरम्यान आके -मडगाव व पणजी  येथे आरोपी सादिक शेख याने पर्वरी हाऊसिंग बोर्ड येथे 200 चौरस मीटर जमीन देतो सांगून तक्रारदाराकडून 5.77 लाख रुपये घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या 420 कलमाखाली गुन्हा नोंद केला असून उपनिरीक्षक नीलेश शिरवईकर याप्रकरणी तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.