5.4 रिश्टर स्केलचा पाकिस्तानमध्ये भूकंप
06:14 AM Jun 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
► वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
Advertisement
पाकिस्तानमध्ये शनिवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 5.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. शनिवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार 8:53 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या आकडेवारीनुसार, भूकंपाचे केंद्र पाकिस्तानमध्ये जमिनीखाली सुमारे 40 ते 75 किलोमीटर खोलीवर होते. प्राथमिक अहवालांनुसार अद्याप कोणतीही मोठी जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. परंतु स्थानिक प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
Advertisement
Advertisement