For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंदी महासागरात 53 लाख वर्षे जुन्या व्हेल्सची अंत्यभूमी

06:25 AM Jun 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
हिंदी महासागरात 53 लाख वर्षे जुन्या व्हेल्सची अंत्यभूमी
Advertisement

चिनी वैज्ञानिकांनी लावला ऐतिहासिक शोध

Advertisement

हिंदी महासागराच्या तळाला जगातील सर्वात मोठ्या ‘व्हेल्स“च्या अंत्यभूमीचा शोध लावण्यात आला आहे. चिनी वैज्ञानिकांकडून लावण्यात आलेल्या या ऐतिहासिक शोधातून लाखे वर्षांपूर्वीच्या व्हेलच्या सांगाड्यांचे हे विशाल क्षेत्र खोल समुदात जीन अन् नव्या प्रजातींचे अत्यंत मोठे ठिकाण ठरले आहे. नेचरमध्ये प्रकाशित संशोधनानुसार हे पृथ्वीवर आतापर्यंतचे सर्वात खोल आणि सर्वात जुनी ज्ञात व्हेल अंत्यभूमी आहे. ज्यातील काही जीवाश्म सुमारे 53 लाख वर्षे जुने आहेत. या शोधाला मूर्त रुप देण्यासाठी चिनी वैज्ञानिकांनी फेंडोजे नावाच्या एका छोट्या पाणबुडीचा वापर केला आहे.

Advertisement

या पाणबुडीने 2023 दरम्यान सुमद्रात एकूण 32 वेळा खाली उडी घेतली होती. ज्याच्या निष्कर्षांना आता जगासमोर मांडण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेत हिंदी महासागरात सुमारे 1200 किलोमीटर लांब क्षेत्रात हे सांगाडे फैलावलेले आहेत, ज्याला ‘डायमेंटीना झोन“ म्हटले जाते. रोबोटिक आर्म्सच्या मदतीने समुद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे 7 किलोमीटर खोलवर 500 च्या सुमारास सांगाड्याचे नमुने गोळा करण्यात आले आहे. हाडांचे हे मोठे प्रमाण पाहता या पूर्ण क्षेत्रात 1 कोटीहून अधिक व्हेलचे सांगाडे असू शकतात असा वैज्ञानिकांचा अनुमान आहे.

व्हेल फॉल काय आहे?

जेव्हा एखाद्या व्हेलचा मृत्यू होतो आणि त्याचे भरभक्कम शरीर समुद्राच्या तळाला जाते, तेव्हा विज्ञानाच्या भाषेत याला ‘व्हेल फॉल“ म्हटले जाते. अंधार, थंड अन् निर्जन समुद्राच्या तळावर हे मृत शरीर खोल समुद्राच्या जीवांसाठी भोजन अन् ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत ठरते. हा विशेष भाग व्हेलमाशांची शिकार आणि भोजनाचे एक अत्यंत पसंतीचे ठिकाण राहिले असावे. या ठिकाणावर समुद्रात खाली व्ही आकाराची एक विशाल दरी असून ती मृत व्हेल्सच्या शरीरांना एका कीपप्रमाणे सामावून थेट समुद्राच्या तळाला एका ठिकाणी एकत्र करते.

एक नवे अन् अनोखे जग

या व्हेलच्या  अंत्यभूमीला स्वत:च्या डोळ्यांनी पाहणे प्रत्यक्षात एक अविश्वसनीय अनुभव होता. समुद्राचा खालील हिस्सा पूर्णपणे अंधकारमय, थंड अन् मृत मानला जातो, परंतु या सांगाड्यांनजीक अत्यंत जिवंत इकोसिस्टीम श्वास घेत होती असे या संशोधनाचे सहलेखक पेंग झोउ यांनी सांगितले आहे. वैज्ञानिकांनी या मृत शरीरांवर पोसणारे असे अनेक जीव पाहिले, जे बहुधा विज्ञानासाठी अत्यंत नवे आहेत. यात विशेष प्रकारची जेलीफिश, ब्रिटिशल स्टार्स, हाडांना शोधणारे किडे आणि बाइवाल्व्स नावाचा मोलस्क सामील आहे. याचबरोबर वैज्ञानिकांनी या जीवाश्मांमध्ये व्हेलची एक अशी विलुप्त झालेली प्रजाती ओळखली आहे, जिला पूर्वी कधीच पाहिले गेले नव्हते. या संशोधनाचे मुख्य लेखक शियाओतोंग पेंग यांनी इतक्या मोठ्या संख्येत व्हेलच्या सांगाड्यांमधील वसा अन् पेशी जवळपास 67 लाख टन कार्बन शोषून घेतात, हे खोल समुद्राच्या जीवांसाठी पोषणाचे एक असे माध्यम आहे, जसे समुद्राखालील हायड्रोथर्मल वेंट्स असतात.

हा व्हेल फॉल समुद्रात जीवांच्या विकासाच्या केंद्राच्या रुपात काम करतो आणि वेगवेगळ्या समुद्री जीवांना परस्परांशी जोडण्यासाठी एका पूलाचे काम करतो हे या शोधाद्वारे सिद्ध होते. अमेरिकेचे जीवाश्मतज्ञ स्टीफन गॉडफ्रे यांनी या शोधाची तुलना 1977 मध्ये झालेल्या हायड्रोथर्मल वेंट्सच्या ऐतिहासिक शोधाशी केली ओ. हा शोध एखाद्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या ट्रेलरसारखा आहे. भविष्यात समुद्रात असे अनेक अन् लपलेले खजिने तसेच रहस्यं समोर येणार आहेत असे गॉडफ्रे यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.