For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

केरी तपासणी नाक्यावर 5.18 लाखांची रोकड जप्त

11:08 AM Apr 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
केरी तपासणी नाक्यावर 5 18 लाखांची रोकड जप्त

वाळपई पोलिसांची कारवाई, वाहन ताब्यात

Advertisement

वाळपई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केरी चेकनाक्यावर सुरू असलेल्या कडक तपासणीत काल रविवारी गोव्यातून कर्नाटकला जाणाऱ्या कर्नाटक पासिंगच्या गाडीतून 5 लाख 18 हजार ऊपयांची रक्कम जप्त करण्यात आली. ही रक्कम कोणत्या कामासाठी नेण्यात येत होती, याची माहिती देऊ न शकल्याने रकमेसह, वाहनही जप्त करण्यात आले आहे. वाळपई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार 31 मार्च रोजी सकाळी 10.30 वा. केरी येथे गाड्यांची तपासणी सुरू असताना कर्नाटकच्या बाजूने जाणाऱ्या टोयोटा एटीएस (केए 42 ए 5164) या गाडीमध्ये 5 लाख 18 हजार ऊपये आढळून आले. रकमेबाबत विचारणा केली असता ठोस पुरावे त्याच्याकडे सापडलेले नाहीत. यामुळे सदर रक्कम निवडणुकीसाठी वापरण्यात येण्याच्या प्राथमिक संशयावऊन तसेच आचारसंहितेचा भंग असल्याच्या कारणावऊन ती जप्त करण्यात आली. अधिकारी समर्थ गावकर यांनी सायंकाळी 4 वाजता वाळपई पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

वाळपई पोलीस निरीक्षक राहुल नाईक यांनी सांगितले की, निवडणूक आचारसंहितेमुळे केरी तपासणी नाक्मयावर कडक तपासण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी व सत्तरी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी नीलेश धायमोडकर यांनी ही यंत्रणा कडक केलेली आहे. 50 हजारापेक्षा पेक्षा जास्त  रक्कम घेऊन जाताना सबळ पुरावे असणे गरजेचे आहे. मात्र या गाडीमध्ये सापडलेली रक्कम ही पुराव्याविना असल्यामुळे ती बेकायदेशीर ठरते. यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्यातरी कुणालाही अटक केलेली नाही मात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील चौकशी सुरू असून चौकशीनंतरच अटकेची कारवाई करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक अल्लाउद्दीन खान यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली असून डिचोलीचे पोलीस उप अधीक्षक सागर एकोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाळपई पोलीस निरीक्षक राहुल नाईक पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

 तपासणी प्रक्रिया आणखी कडक करणार

Advertisement

उपजिल्हाधिकारी नीलेश धायमोडकर यांनी सदर महामार्ग दोन राज्यांना जोडणारा  असल्यामुळे येथील तपासणीची प्रक्रिया आणखी कडक करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :
×

.