For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Legislative Council Election | सोलापूर विधान परिषद निवडणूक: भाजप नगरसेवकांच्या शिस्तबद्ध रांगा; मतदानात दाखवली एकजूट

01:11 PM Jun 18, 2026 IST | NEETA POTDAR
solapur legislative council election   सोलापूर विधान परिषद निवडणूक  भाजप नगरसेवकांच्या शिस्तबद्ध रांगा  मतदानात दाखवली एकजूट
Advertisement

Advertisement

सोलापूर : सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेसाठी सुरू असलेल्या निवडणुकीत सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ४९.६८ टक्के मतदानाची नोंद झाली. जिल्ह्यातील सहा मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर शहरातील मतदान केंद्रावर भाजप नगरसेवकांच्या शिस्तबद्ध रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असलेल्या मतदारांनी मतदानासाठी सकाळपासूनच केंद्रांवर हजेरी लावली. विशेषतः सोलापूर शहरातील उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर भाजपच्या नगरसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने मतदानासाठी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. पक्षाच्या सूचनांचे पालन करत नगरसेवकांनी नियोजनबद्ध पद्धतीने मतदान केल्याने केंद्रावर शिस्तीचे वातावरण दिसून आले. महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात होत असलेल्या या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement

प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार असल्याने विविध पक्षांकडून आपल्या सदस्यांना मतदानासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सर्व मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून निवडणूक प्रशासनाकडून वेबकास्टिंगद्वारे मतदान प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवले जात आहे.

Advertisement
Tags :

.