47 वर्षीय शमिताला मिळाले नवे प्रेम
प्रेम वयाच्या कुठल्याही टप्प्यात प्राप्त होऊ शकते, असे बोलले जाते. आता प्रख्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिताच्या आयुष्यात प्रेमाने एंट्री केली आहे. शमिता आणि दीपेश शर्मा हे परस्परांच्या प्रेमात पडले असल्याचे समोर आले आहे. दीपेशने शेअर केलेल्या पोस्टमध्ये शमिता दिसून येत आहे. या पोस्टमध्ये त्याने अप्रत्यक्ष स्वरुपात शमितासोबत प्रेमात असल्याची कबुलीच दिली आहे.
दीपेश शर्मा हा टेक्नो आर्टिस्ट आहे. दीपेशसोबतच्या नात्यात ती आनंदी असल्याचे तिच्या काही निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे. दीपेशसोबत ती सध्या बराच वेळ घालवित आहे. दोघेही परस्परांना अधिक समजून घेतल्यावर नात्याची अधिकृत वाच्यता करणार असल्याचे समजते.
दीपेशपूर्वी शमिता ही अभिनेता राकेश बापटसोबत रिलेशनशिपमध्ये राहिली होती. दोघांचे नाते बिग बॉसच्या घरातून सुरू झाले होते. तर त्यापूर्वी तिचे नाव उदय चोप्रासोबत जोडले गेले होते. यानंतर राकेश आणि शमिताचा ब्रेकअप झाला होता. शमिताने ‘मोहब्बतें’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण पेले होते. यानंतर ती ‘फरेब’, ‘कॅश’, ‘बेवफा’ आणि ‘जहर’ समवेत अन्य काही चित्रपटांमध्ये दिसून आली होती.