For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आफ्रिकेत अपघातात 45 प्रवाशांचा मृत्यू

06:58 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
आफ्रिकेत अपघातात 45 प्रवाशांचा मृत्यू
Advertisement

केवळ 8 वर्षांची मुलगी बचावली : बस 165 फूट खोल दरीत कोसळल्याने दुर्घटना

Advertisement

वृत्तसंस्था/ केपटाऊन

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या भीषण बस अपघातात 45 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस पुलावरून दरीत पडली होती. उत्तर-पूर्व लिम्पोपो प्रांतातील एका पुलापासून सुमारे 50 मीटर (165 फूट) खोल दरीत बस कोसळल्याने 45 लोक ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुदैवाने या अपघातात केवळ 8 वर्षांची मुलगी बचावली. तिला गंभीर दुखापत झाली असली तरी सध्या प्रकृती स्थिर आहे. बस पुलाच्या रेलिंगला धडकल्यानंतर मुलगी बसमधून फेकली गेल्यामुळे ती बचावल्याची माहिती बचाव पथकाकडून देण्यात आली.

Advertisement

जोहान्सबर्गच्या उत्तरेस सुमारे 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या मातलाला पर्वताच्या खिंडीत मोकोपेने आणि मार्काने दरम्यानच्या पुलावर बस दुर्घटनाग्रस्त झाली. दरीत कोसळल्यानंतर काही वेळातच बसने पेट घेतला. अपघातग्रस्त बसमधील प्रवासी बोत्सवानाची राजधानी गॅबोरोन येथून मोरिया शहरात इस्टर सेवेसाठी जात होते, असे सांगण्यात येत आहे. घटनास्थळावरून 34 मृतदेह काढण्यात आले आहेत, मात्र केवळ 9 जणांची ओळख पटली आहे. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.

Advertisement
Tags :

.