महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिंदुस्थान युनिलिव्हरला 447कोटी रुपयांची जीएसटीची नोटीस

06:46 AM Jan 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नोटीसीवर कंपनी विचार करुन उत्तर देणार

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

देशातील अग्रगण्य एफएमसीजी निर्मितीमधील कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (एचयुएल) ने सांगितले की एकूण 447.5 कोटी रुपयांची जीएसटी नोटीस आली आहे. नियामक फाइलिंगमध्ये, एचयुएलकडे लक्स, लाईफबॉय, सर्फएक्सल, रिन, पाँड्स आणि डोव्ह सारख्या ब्रँडची मालकी आहे. जीएसटी क्रेडिट नाकारणे, प्रवासींना देण्यात येणारे भत्ते इत्यादींसह पगार इत्यादी मुद्यांवर कंपनीला गेल्या आठवड्यात शुक्रवारी आणि शनिवारी जीएसटी प्राधिकरणांच्या विविध क्षेत्रांकडून नोटीसा आल्या.

यामध्ये सहआयुक्त, सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई पूर्व यांच्याकडून 372.82 कोटी रुपयांची मागणी आणि वेतनावरील कर 39.90 कोटी रुपयांच्या दंडाचा समावेश आहे, असे व्यावसायिक कर उपायुक्त, बेंगळुरू यांनी देखील सांगितले आहे. 8.90 कोटी रुपयांचे अतिरिक्त जीएसटी क्रेडिट आणि 89.08 लाख रुपयांच्या दंडाच्या आधारे कर मागणी जारी करण्यात आली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article