For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मिडकॅपचा 44 तर स्मॉलकॅपचा 54 टक्के परतावा

06:33 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
मिडकॅपचा 44 तर स्मॉलकॅपचा 54 टक्के परतावा
Advertisement

यावर्षी 58 आयपीआयपीओचे सादरीकरण

Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

शेअर बाजाराने यावर्षी गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देण्याचे काम केले आहे. मिडकॅप 100 निर्देशांकातील कंपन्यांनी यावर्षी जवळपास 44 टक्के इतकी तेजी दाखवली आहे. त्यातुलनेमध्ये निफ्टी स्मॉलकॅप-100 निर्देशांकामधील कंपन्यांनी 54 टक्के इतका परतावा दिला आहे.

Advertisement

कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली. यंदा शेअरबाजाराची एकंदर तेजीकडे वाढणारी दिशा पाहून अनेक गुंतवणूकदार खुश झाले आहेत. निफ्टी निर्देशांक जवळपास 21,500 च्या स्तरावर पोहचला आहे तर बीएसई सेन्सेक्स 72 हजार अंकांपर्यंत पोहोचला होता. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये शेअरबाजारात गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या  आत्मविश्वासामुळे शेअर बाजार चांगला तेजी दाखवू शकला. 2023 मध्ये आतापर्यंत निफ्टी निर्देशांकाने 18 टक्के इतका परतावा दिला आहे. कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकामध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली.

58 आयपीओ यंदा बाजारात

यावर्षी आयपीओंची संख्यासुद्धा मोठी होती. यावर्षी साधारण 58 आयपीओ शेअरबाजारामध्ये सादर करण्यात आले असून या अंतर्गत 48000 कोटी रुपयांची उभारणी करण्यात आली आहे. हेही नसे थोडके. गेल्या वर्षी 40 आयपीओ शेअर बाजारात दाखल झाले होते. सदरच्या आयपीओमधून मात्र मागच्या वर्षी 64 हजार कोटी रुपयांची उभारणी करण्यात आली होती.

नव्या वर्षातही आयपीओ येणार

पुढील वर्षीही मोठ्या प्रमाणात आयपीओंचे सादरीकरण होणार आहे. सेबी या नियामक संस्थेने आतापर्यंत 27 कंपन्यांना आयपीओ सादरीकरणासाठी मंजुरी दिली आहे. आयपीओ आणणाऱ्यांमध्ये ओला इलेक्ट्रिक, स्विगी, फर्स्ट क्राय, टाटा प्ले, ओयो, गो डिजिट इन्शुरन्स अशा महत्त्वाच्या कंपन्यांचा समावेश असेल.

या क्षेत्रांचा उत्तम परतावा

तसे पाहता 2023 मध्ये सार्वजनिक बँकांचा निर्देशांक, रियल्टी निर्देशांक, ऑटो आणि ऊर्जा, संरक्षण, शिपिंग, फर्टीलायझर यासारख्या क्षेत्रातील कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या समभागांनी परतावा देण्यात खासगी बँकांना मागे टाकले आहे. दुसरीकडे भारतातील बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 4 ट्रिलियन डॉलरच्या वर पोहोचले आहे.

Advertisement
Tags :

.