तक्रार निवारणदिनी ४३७ जणांचे अर्ज निकाली
सांगली :
उप विभाग व पोलीस ठाणे स्तरावर दर शनिवारी घेण्यात येणाऱ्या तक्रार निवारण दिनामध्ये सांगली जिल्ल्यात ४३७ जणांचे अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक व इतर तक्रारदार यांचे तक्रारीचे यावेळी निराकरण करण्यात आला.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्वतः जत पोलीस ठाणेस भेट देवून तक्रारदार यांचे तक्रारी जाणून घेवून त्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत संबंधित अधिकारी/अंमलदार यांना सूचना देऊन त्यामध्ये एकूण २० तक्रारदाराचे तक्रारीचे निराकरण केले.
अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यास भेट देवून एकूण २४ तक्रारदार यांचे तक्रारी जाणून घेवून त्याबाबत योग्य कायदेशीर कारवाई करणेबाबत संबंधित अधिकारी/अंमलदार यांना सूचना देवून तक्रारीचे निराकरण केले.
उप विभागात तक्रार निवारण दिनामध्ये सांगली शहर उपविभागात १४९ तक्रारीचे निवारण करण्यात आले. मिरज उपविभागात ४४ तर तासगाव उपविभागात ४४, विटा उपविभागात २२ तर इस्लामपूर उपविभागात १०३ आणि जत उपविभागात ७५ जणांचे अर्ज निकालात काढण्यात आले. एकूण ४३७ जणांचे अर्जावर निवारण करण्यात आले.
सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, प्रत्येक शनिवारी पोलीस ठाणे तसेच उपविभागीय कार्यालय स्तरावर तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन तक्रारीचे निराकरण करण्यात येते.
तरी ज्यांची तक्रार असेल त्यांनी संबंधित पोलीस ठाणेला हजर राहून आपल्या तक्रारीचे निराकरण करून घ्यावे. यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.