भिरवंडेत स्ट्रीट लाईटसाठी 43 पोल मंजूर
महावितरणच्या ठेकेदारकडून प्राथमिक सर्व्हे ; नवनिर्वाचित जि प सदस्य संदेश सावंत यांच्याकडून आश्वासनपूर्ती
कनेडी / वार्ताहर -
भिरवंडे गावातील वरची परतकामवाडी, वाचुकले वाडी, हनुमंत वाडी, मुर्डवेवाडी, जांभूळ भाटले वाडी, वस्ती मधील काही भागात स्ट्रीट लाईट बसविण्याचे शिल्लक राहिलेले होते व तशी मागणी या वाडीतील ग्रामस्थांनी माजी जि. प अध्यक्ष व नवनिर्वाचित जि .प सदस्य संदेश उर्फ गोटया सावंत यांच्याकडे केली होती. ही बाब लक्षात घेऊन संदेश सावंत यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून या स्ट्रीट लाईटचे 43 पोलचे काम मंजूर करून घेतले आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या कामाचा प्राथमिक सर्व्हे महावितरणच्या ठेकेदार यांनी केला असून लवकरच पोलची उपलब्धता झाल्यावर या कामाचा शुभारंभ करून कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. वरील भागात सर्व्हे करून स्ट्रीट लाईटच्या कामाला सुरुवात होणार असल्याने गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेश राणे व संदेश उर्फ गोटया सावंत यांचे आभार मानले आहेत.