आर्थिक नुकसानीची जबाबदारी 43 जणांवर
कराड :
येथील शिवशंकर नागरी पंतसंस्थेच्या 1999 ते 2022 अखेरच्या तब्बल 43 संचालकांवर 33 कोटी 20 लाखांची आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश झाले आहेत. सहकारी संस्थांच्या कलम 1960 च्या 88 व 1961 च्या नियम 73 (3) च्या नुसार संस्थेचे प्राधिकृत अधिकारी अॅड. समाधान ढोणे यांनी ती कार्यवाही केली आहे, अशी माहिती संस्थेच्या ठेवीदार बचाव संघटनेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थेचे संचालक मंडळ व अन्य 43 पैकी 21 जणांवर एक कोटी पेक्षाही जास्त रकमेची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ठेवीदार समितीचे उदय हिंगमिरे, प्रा. बी. एस. खोत, सुनील महाजन, निसार मुल्ला व विजय महिंद उपस्थित होते.
ठेवीदार संघटनेचे दिलीप पाटील म्हणाले, शिवशंकर पतसंस्थेच्या अपहार व गैरव्यवहार प्रकरणी 1999 ते 2022 अखेरच्या तब्बल 45 संचालकांवर आर्थिक जबाबदारी ठेवली आहे. त्यात दोघांचा मृत्यू झाल्याने 43 जणांवर 33 कोटी 20 लाखांची आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या लोकांकडून संबंधित रकमा वसूल करण्यात येणार आहेत.
संस्थेचे मावळते अध्यक्ष शरद मुंढेकर - एक कोटी 44 लाख 75 हजार 609, महेश शिंदे (मावळेत उपाध्यक्ष) - एक कोटी 33 लाख 54 हजार 705 यांच्यासह अन्य संचालकांत श्रीकांत आलेकरी - एक कोटी 33 लाख 86 हजार 383, मिलिंद लखापती - एक कोटी 30 लाख, सतीश बेडके, मनोज दुर्गवडे प्रत्येकी एक कोटी 44 लाख एक हजार 627, शंकर स्वामी, महादेव बसरगी, सुभाष बेंद्रे, दत्तात्रय शिंदे, ज्ञानेश्वरी बारटक्के, नितीन चिंचकर, सुनील काशिद यांच्यावर प्रत्येकी एक कोटी 44 लाख 75 हजार 609, शिवाजी पिसाळ - एक कोटी 33 लाख 86 हजार 384, संग्राम स्वामी, राजेंद्र स्वामी यांच्यावर प्रत्येकी एक कोटी 33 लाख 86 हजार 382, सतीश तोडकर 10 लाख 89 हजार 232, राजेंद्र भादुले, दत्तात्रय तारळेकर, सुनीता आलेकरी, संजय बटाणे, यांच्यावर प्रत्येकी दहा लाख 46 हजार 924, दत्तात्रय लोकरे, वृषाली मुंढेकर, सिंधू जुगे, शंकर घेवारी यांच्यांवर प्रत्येकी 62 लाख दीपक कोरडे 81 लाख 93 हजार 671, प्रेमलता बेंद्रे, महालिंग मुंढेकर, तात्यासाहेब विभुते यांच्यावर प्रत्येकी 71 लाख 44 हजार 442, परसू काळे, राजू कोरडे, संजय काळे, तेजश्री दुर्गवडे, भारती गाडवे यांच्यावर प्रत्येकी दोन लाख 84 हजार 796, रवींद्र स्वामी 62 लाख 81 हजार 937, दीपक टकले, यशवंत फल्ले, रघुनाथ काटू, सुनंदा स्वामी शालन विभुते यांच्यावर प्रत्येकी 73 हजार 985 तर शिवाजी मानकर यांच्यावर 81 लाख 93 हजार 673 याप्रमाणे सुमारे 33 कोटी 20 लाख रूपये आर्थिक
नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.