Gokul Election | सतेज पाटील आणि विश्वास पाटील यांचा थेट कोर्टात एल्गार! 'त्या' अपात्रतेच्या कारवाईविरोधात सर्किट बेंचमध्ये धाव
४२७ संस्था अपात्र ठरल्याने गोकुळ राजकारण तापले
कोल्हापूर : कोणतीही नोटीसन देता, सुनावणी न घेता थेट अपात्रतेची कारवाई केल्याप्रकरणी आमदार सतेज पाटील व गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांनी कोर्टात धाव घेतली आहे. ४२७ जणांच्या वतीने ९ संस्था गुरुवारी कोल्हापूर सर्कीट बेंचमध्ये अपिल याचिका दाखल करणार आहेत. या ९ मध्ये सतेज पाटील यांच्या गटाच्या ३ तर विश्वास नारायण पाटील यांच्या ६ संस्था आहेत.
विभागीय दुग्ध निबंधक राजकुमार पाटील यांच्या आदेशान्वाये सोमवारी ४२७ संस्था मतदानासाठी अपात्रठरवल्याचे सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी घोषित केले होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हा दणका दिल्याने सत्ताधारी आणि विरोधी गटामध्येही खळबळ उडाली आहे.सोमवारी हा आदेश काढल्यावर लगेचच दुसऱ्या दिवशी संस्था चालकांसह राजकीय प्रतिनिधींनी सहनिबंधकांची भेट घेऊन त्यांना अपात्रतेचे कारण विचारले.
पण समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या सर्व ४२७ संस्थांना घेऊन कोर्टात धाव घेणार असल्याचे बुधवारी संध्याकाळी आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. ४२७ संस्था या अपात्रच ठरणार असा पूर्वीपासून कयास बांधला जात होता. अगदी तसेच घडले आहे. या ४२७अपात्रच्या यादीत महायुती व समविचारी अघाडी या दोघांच्याही संस्था जास्त दिसत आहेत.