For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

४२ तासांचे अखंड लाईव्ह महाकव्हरेज; ‘तरुण भारत डिजिटल’ला ४ लाख ३७ हजारांहून अधिक व्ह्यूज

08:15 AM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
४२ तासांचे अखंड लाईव्ह महाकव्हरेज  ‘तरुण भारत डिजिटल’ला ४ लाख ३७ हजारांहून अधिक व्ह्यूज
Advertisement

बेळगावच्या ऐतिहासिक सार्वजनिक श्री गणेश विसर्जन सोहळ्याचे देश-विदेशातील लाखो भाविकांनी घेतले थेट दर्शन

Advertisement

बेळगावचा नंबर 1 डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म ‘तरुण भारत न्यूज’ शहरासह देशातील  प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तरुण भारत न्यूज या यूट्यूब, फेसबुक, इन्स्टा, ट्विटरला फॉलो, लाईक आणि सबक्राईब करायला विसरू नका. 

बेळगाव : बेळगावच्या ऐतिहासिक सार्वजनिक श्री गणेश विसर्जन सोहळ्याचे ‘तरुण भारत डिजिटल’ने केलेले 42 तासांचे अखंड लाईव्ह महाकव्हरेज डिजिटल माध्यमांवर विशेष ठरले. गणेश विसर्जन मिरवणुकीतील प्रत्येक महत्त्वाचा क्षण थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवित या प्रक्षेपणाला आतापर्यंत 4 लाख 37 हजार 896 व्ह्यूज मिळाले आहेत. ‘तरुण भारत डिजिटल’च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून विसर्जन मिरवणुकीचे सातत्याने थेट प्रक्षेपण करण्यात आले. बेळगावच्या गणेशोत्सवाची भव्यता, पारंपरिक उत्साह आणि भक्तिमय वातावरण देश-विदेशातील भाविकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

Advertisement

ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचे सूर, आकर्षक देखावे आणि गणेशभक्तांचा उत्साह यांचे थेट दर्शन प्रेक्षकांना घरबसल्या घेता आले. मिरवणुकीतील घडामोडींचे अप-टू-डेट कव्हरेज देत ‘तरुण भारत डिजिटल’ने प्रक्षेपण अखंड सुरू ठेवले. या लाईव्ह कव्हरेजला दुबई, अमेरिका, जर्मनी तसेच वेस्ट इंडिजसह देश-विदेशातील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. विविध सोशल मीडिया

प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांनी कमेंट्स आणि प्रतिक्रियांद्वारे आपला उत्साह व्यक्त केला.बेळगावच्या ‘राजा‘ला अंतिम निरोप मिळेपर्यंत थेट प्रक्षेपण सुरू ठेवण्यात आले. त्यामुळे प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ न शकलेल्या देश-विदेशातील गणेशभक्तांनाही या ऐतिहासिक सोहळ्याशी जोडले जाण्याची संधी मिळाली. 42 तासांचे अखंड थेट प्रक्षेपण आणि 4,37,896 गणेशभक्तांनी याला प्रतिसाद दिल्याने हे ‘तरुण भारत डिजिटल‘च्या गणेशोत्सव कव्हरेजचे वैशिष्ट्या ठरले. बेळगावच्या ऐतिहासिक गणेश विसर्जनाचा प्रत्येक क्षण डिजिटल माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात ‘तरुण भारत डिजिटल‘ने महत्त्वाची भूमिका बजावली.

Advertisement

.