प्रतिदिन 4 हजार पावले चालल्याने मेंदूची वाढ
स्मृतिभ्रंशाचा टळतो धोका
सकाळ आणि संध्याकाळी उद्यानात किंवा रस्त्याच्या कडेला लोक फिरताना दिसून येतात. यातील अनेक लोक मनगटावर घड्याळासारखे उपकरण बांधून असतात, जे पेडोमीटर असते, संबंधित व्यक्तीचे पावले मोजण्याचे काम हे उपकरण करत असते. सहसा पेडोमीटरचे डीफॉल्ट सेटिंग 10 हजार पावलांवर सेट केले जाते, दररोज 10 हजार पावले चालल्याने हृदय, मन आणि शरीर निरोगी राहते असे मानले जाते, परंतु एवढं मोठं लक्ष्य पाहून अनेक जण मागे हटतात, पण नवीन आरोग्य अभ्यासामुळे त्यांची ही समस्या दूर होऊ शकते.
जर्नल ऑफ अल्झायमर डिसिजमध्ये प्रकाशित एका अध्ययनानुसार जर दररोज काही हजार पावले चालत असाल किंवा काही प्रमाणात व्यायाम करत असाल तर तुमच्या मेंदूचा आकार वाढू शकतो. मेंदूचा मोठा आकार म्हणजे तो निरोगी असणे आहे. यामुळे त्याचे सर्व न्यूरोट्रान्समीटर योग्यप्रकारे काम करत असल्याचे मानण्यात येते. म्हणजेच संबंधित व्यक्तीला डिमेंशिया किंवा अल्झायमरचा धोका नसतो. 10 हजारांहून अधिक लोकांवर केलेल्या अध्ययनानुसार जे लोक दररोज काही हजार पावले चालत होते, त्यांचा मेंदू इतरांपेक्षा मोठा होता.
वैज्ञानिकांनुसार दररोज 4 हजार पावले चालणे देखील पुरेसे आहे. दररोज मध्यम व्यायाम केल्याने मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो, त्याकरता दिवसाला 4 हजार पावले चालणेही पुरेसे असल्याचे पॅसिफिक न्यूरोसायन्स इन्स्टिट्यूटच्या ब्रेन हेल्थ सेंटरचे संचालक आणि संशोधनाचे लेखक डॉ. डेव्हिड मेरिल यांनी म्हटले आहे.
शारीरिक हालचालींमुळे मेंदूमध्ये रक्त प्रवाह वाढतो, यामुळे मेंदूपर्यंत अधिक ऑक्सिजन पोहोचतो, म्हणजेच त्याला अधिक शक्ती मिळते. मेंदूमध्ये चांगला रक्तप्रवाह झाल्यामुळे मेंदूच्या विकासाशी संबंधित अधिक न्यूरोट्रान्समीटर आणि रसायने बाहेर पडतात. नवीन न्यूरॉन्स लवकर विकसित होतात आणि मेंदूची जोडणीही वाढते, व्यायामामुळे मेंदूतील सूज कमी होते आणि मूडही सुधारतो. तर दुसरीकडे मेंदूचा आकार कमी होत असेल तर ते डिमेंशियाचे प्रारंभिक लक्षण असू शकते. मेंदूचा आकार राखणे किंवा वाढवणे याचे न्यूरोप्रोटेक्टिव्ह प्रभाव आहेत