For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अकरावीच्या ४ हजार जागा रिक्त राहणार

02:20 PM May 16, 2025 IST | Radhika Patil
अकरावीच्या ४ हजार जागा रिक्त राहणार
Advertisement

सांगली :

Advertisement

दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीची प्रवेशाची लगबग सुरु होणार आहे. जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६.०९ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील २४२ उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये अकरावीसाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी ४४ हजारावर जागा आहेत. मात्र दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ३६ हजार ९८९ आहे. याशिवाय आयटीआय आणि डिप्लोमाच्या सुमारे अडीच हजार जागा आहेत. त्यामुळे अकरावीच्या सुमारे चार हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात मागील काही वर्षात उच्च माध्यमिक विद्यालयांची संख्या वाढली आहे. एकीकडे महाविद्यालये वाढली असताना विद्यार्थी संख्या मात्र घटत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दहावीच्या परीक्षेला ३८ हजार ४९२ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी ३६ हजार ९८९ जण उत्तीर्ण झाले. अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील अकरावीची प्रवेश क्षमता लक्षात घेता अकरावीच्या जागा या अतिरिक्त ठरण्याचे चित्र दिसून येते.

Advertisement

जिल्ह्यात अनुदानित, विनाअनुदानित  तसेच स्वयंअर्थसहाय्यित असे मिळून २४२ उच्च माध्यमिक विद्यालय आहेत. कला, विज्ञान, वाणिज्य तसेच संयुक्त या सर्व शाखांचे मिळून ४४ हजार ६० इतकी प्रवेश क्षमता आहे. तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३६ हजार ९८९ इतकी आहे. त्यामुळे अकरावीच्या जागा अतिरिक्त होत असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय शासकीय आणि खासगी आयटीआय आणि दहावीनंतर थेट डिप्लोमाही प्रवेश घेतला जातो. या सुमारे अडीच हजार जागांचा समावेश आहे. अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयात कला शाखेसाठी १६ हजार ६००, विज्ञानला १७ हजार ७००, वाणिज्य ७ हजार २६०, किमान कौशल्य व्यवसाय अभ्यासक्रम व अन्य वर्गाकडे २ हजार ५०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित कनिष्ट महाविद्यालयात प्रवेश आहे.

  • जिल्ह्यातील अकरावीची प्रवेश क्षमता

शाळा प्रकार                      शाळा संख्या                      एकूण

अनुदानित                            १३१                               २८३४०

विनाअनुदानित                      ४९                              १०२२०

स्वयं अर्थसहाय्यित                 ६२                              ५५००

एकूण                                २४२                             ४४०६०

Advertisement
Tags :

.