ओमेक्स गुंतवणार 4000 कोटी रुपये
बेंगळूर
बांधकाम विकासक कंपनी ओमेक्स आगामी काळामध्ये 4000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून पुढे चार वर्षाच्या कालावधीमध्ये टायर 2 व टायर 3 शहरांमध्ये रहिवासी व व्यावसायिक प्रकल्पांची उभारणी करणार असल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पंजाब या राज्यांमध्ये बाराशे एकरची जागा कंपनी विकसित करणार आहे. पुढील चार वर्षाच्या कालावधीमध्ये बांधकाम प्रकल्पांच्या विकासासाठी 4000 कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत. लखनऊमध्ये दोन लक्झरी प्रकल्प राबवले जाणार असून या पाठोपाठ इंदोर, उज्जैन, रतलाम या मध्यप्रदेशमधील शहरांमध्ये प्रकल्प राबवले जाणार आहेत. अमृतसर, भटिंडा आणि चंदीगड या पंजाबमधील शहरांमध्ये तसेच लखनऊ, गोरखपूर, अलाहाबाद आणि वृंदावन या उत्तर प्रदेशमधील शहरांमध्ये प्रकल्प विकसित केले जाणार आहेत. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये पुढील चार वर्षांमध्ये विविध प्रकल्पांच्या विकासासाठी 2500 कोटी रुपये गुंतवणूक केली जाणार आहे.