For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

400 मध्ये गॅस सिलिंडर

05:00 AM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
400 मध्ये गॅस सिलिंडर
Advertisement

काँग्रेसचे राजस्थानसाठी घोषणापत्र : 4 लाख रिक्त जागा भरणार

Advertisement

काँग्रेसने मंगळवारी राजस्थान निवडणुकीसाठी घोषणापत्र जारी केले आहे. 4 लाख शासकीय पदे त्वरित भरण्याचे आश्वासन यात सामील आहे. तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना 400 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. याचबरोबर शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींनुसार हमीभावाचा कायदा लागू करणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

घोषणापत्रापूर्वीच काँग्रेसने 7 गॅरंटी जारी केल्या होत्या. यात महिलांना दरवर्षी 10 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य, 500 रुपयांमध्ये सर्वांना गॅस सिलिंडर, शासकीय महाविद्यालयातील प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब किंवा लॅपटॉप, 25 लाख रुपयांचा आपत्ती दिलासा विमा, शेतकऱ्यांकडून शेणखरेदी, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करणे, शासकीय शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे शिक्षण पुरविण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. मागील विधानसभा निवडणुकीसाठी जारी करण्यात आलेल्या घोषणापत्रातील 90 टक्के आश्वासनांची पूर्तता केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

Advertisement

घोषणापत्रातील प्रमुख आश्वासने

?शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींनुसार राज्यात एमएसपी कायदा आणला जाणार

?चिरंजीवी विम्याची रक्कम 25 लाखावरून वाढवत 50 लाख रुपये करण्यात येणार

?4 लाख युवांना शासकीय नोकरी देणार. 10 लाख युवांना रोजगार मिळवून देणार

?पंचायत स्तरावर शासकीय नोकरीचे नवे कार्ड तयार करवून दिले जाणार

?उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना 400 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर दिला जाणार

?खासगी शैक्षणिक संस्थांमध्येही 12 वीपर्यंतचे शिक्षण मोफत केले जाणार

?मनरेगा आणि इंदिरा गांधी शहर रोजगार योजनेचा कालावधी 150 दिवस होणार

?छोटे व्यापारी, दुकानदारांना 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनक्याजी कर्ज देण्यासाठी व्यापारी क्रेडिट कार्ड योजना

?राजस्थानात जातनिहाय सर्वेक्षण करविणार

Advertisement
Tags :

.