For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आपत्ती निवारणासाठी राज्यात 400 आपदामित्र

11:52 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
आपत्ती निवारणासाठी राज्यात 400 आपदामित्र
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : नागरिकांनी ‘सचेत अॅप’ मोबाईलवर स्थापित करावे

Advertisement

पणजी : आपत्ती निवारणासाठी राज्यात एकूण 11 निवारा केंद्रे असून तेथे 400 आपदा मित्र कार्यरत रहाणार आहेत. पावसाळ्यातील आपत्तांrना सामोरे जाण्यासाठी राज्यातील यंत्रणा सतर्क व सज्ज आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पर्वरी मंत्रालयात काल सोमवारी झालेल्या आपत्ती निवारण समितीच्या बैठकीत त्यांनी एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वांनी तयारी करावी आणि सज्ज रहावे असे मार्गदर्शन त्यांनी केले. आपत्तीपूर्वी जनतेला सावध करणे, सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे असून त्याची सूचना देण्यासाठी सरकारने बीएसएनएल, ओएनजीसी यांच्याशी समन्वय केला असून त्यानुसार प्रशिक्षणही देण्यात आल्याचे डॉ. सावंत म्हणाले.

‘सचेत अॅप’ मोबाईलवर घ्यावे

Advertisement

जिल्हा तसेच तालुकानिहाय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून सावंत यांनी त्याची माहिती घेतली. पुराची ठिकाणे,दरडी कोसळण्याची ठिकाणे तसेच धोकादायक जागा, पुराचा धोका असलेली नदी, नाले, त्यांचे गाळ उपसणे याचा बैठकीतून आढावा घेण्यात आला. लोकांनी ‘सचेत अॅप’ मोबाईलवर स्थापित करावे, त्यातून आपत्तीची पूर्वसूचना, माहिती मिळते असेही ते म्हणाले.

धोक्याच्या ठिकाणी सूचना फलक  

बंद चिरेखाणी धबधबे, कालवे, खंदके, तळी, तलाव अशा ठिकाणी पोहायला जाऊ नका, पाण्याचा अंदाज येत नसल्याने तेथे कोणताही धोका होऊ शकतो. पावसाळ्यात तर तेथे मोठ्या प्रमाणात पाणी असते. ती ठिकाणे पोहण्यासाठी धोकादायक असतात. तरबेज असणारे देखील तेथे पोहू शकत नाहीत. सर्वांनी म्हणजे मुले, पालकांनी तेथे जाणे टाळावे, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केली आहे. अशा विविध ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात येणार असून सार्वजनिक बांधकाम खात्यास त्यासंदर्भात निर्देश जारी करण्यात आले आहेत.

हवामानविषयी माहितीसाठी तीन अॅप

राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीचे काम चांगले असून उष्णतेचा कहर होणार याचा अंदाज घेऊन राज्य सरकारने गोवा उष्णता लाट कृती आराखडा मार्चमध्ये तयार करण्यात आला होता. त्यानुसार तापमानाची माहिती जनतेला वेळोवेळी देण्यात येत आहे. हवामानाशी संबंधित माहिती जनतेला मोबाईलवर मिळावी म्हणून केंद्र सरकारतर्फे मेघदूत, मोसम व दामिनी हे तीन अॅप सुरू करण्यात आले असून त्याद्वारे पूर्वसूचना देण्यात येत आहेत. गोव्यातील केवळ 500 लोकांनीच सदर अॅप मोबाईलवर घेतले असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.

आस्थापनांतील कामगार तपासणी बंधनकारक

कंत्राटदार व आस्थापनांनी कामगारांची आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. रक्तदाब, मधूमेह नियंत्रणात असावे तरच त्यांना कामावर घ्यावे, त्यांची तपासणी बंधनकारक आहे, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.

Advertisement
Tags :

.