कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बलिदान मास पाळला म्हणून ४० विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढले

05:19 PM Mar 03, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

सरवडे गावातल्या एका शाळेतील घटना

Advertisement

हिंदुत्वादी संघटनेचा आरोप; कारवाईची मागणी

Advertisement

हिंदुत्ववादी संघटना आंदोलन

कोल्हापूर

कोल्हापुरातल्या राधानगरी तालुक्यातील सरवडे या गावातल्या शाळेत विद्यार्थ्यांनी बलिदान मास पाळला म्हणून त्यांना शाळेतून बाहेर काढल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शिवाय शाळेच्या मुख्याध्यापकांचे भाऊ सरपंच आहेत. त्यांनीही हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  संबंधितांनी माफी मागावी शिवाय त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदुत्वादी संघटनांनी निदर्शने केली..

शाळेच्या प्राचार्यांनी ४० मुलांना छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळला, म्हणून त्यांना गुडघ्यावर रांगायला लावले. दरम्यान तेथील हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी त्या मुलांना बलिदान मास पाळू नका, मूंडन करू नका, फक्त अनवाणी फीरा, अशी सूचना दिली होती. तरी या मुलांनी स्वइच्छेने बलिदान मास पाळला आहे. या प्रकाराची माहिती विश्व हिंदु परिषदेच्या कुंदन पाटील यांना दिल्यावर, त्यांनी शाळा प्रशासनाला या प्रकाराबद्दल सांगितले असता, शाळेने आम्हाला हे चालणार नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. या विषयी तक्रार केली जाईल असे ही सांगण्यात आले. त्यानंतर शाळेच्या प्राचार्यांच्या भावाने गावाचा सरपंच गावातील केश कर्तनालयाची तोडफोड केली. याविषयी मी आणि कुंदन पाटील यांनी राधानगरी पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. सरवडे गावात प्रकरणाचा पंचनामा केला आहे. तरीही त्या शाळेच्या प्राचार्य आणि गावच्या सरपंचाला अटक झाली नाही, अशी प्रतिक्रिया हिंदुत्त्ववादी संघटनेचे दिपक देसाई यांनी दिली.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article