For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

पंतप्रधानांसह 40 स्टार प्रचारक

06:28 AM Mar 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधानांसह 40 स्टार प्रचारक

भाजपकडून राज्यासाठी नावे जाहीर : पी. राजीव, फडणवीस, प्रमोद सावंत यांचा समावेश

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

भाजपच्या केंद्रीय समितीने राज्यासाठी 40 जणांचा समावेश असणारी स्टार प्रचारकांची यादी दिली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, येडियुराप्पा, बसवराज बोम्माई, सदानंदगौडा, आमदार पी. राजीव यांचा समावेश आहे.

Advertisement

राज्य भाजपचे मुख्य सचिव आणि निवडणूक व्यवस्थापन समितीचे राज्य संचालक व्ही. सुनीलकुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे. त्यात राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांप्रमाणेच इतर राज्यांमधील प्रभावी नेते आणि राज्यातील माजी मुख्यमंत्री व नेत्यांचा समावेश केला आहे. एकूण 40 जणांची नावे या यादीमध्ये आहेत.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, एस. जयशंकर, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, शोभा करंदलाजे, ए. नारायणस्वामी, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, डी. व्ही. सदानंदगौडा, जगदीश शेट्टर, बसवराज बोम्माई, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नेते आण्णा मलाई, डॉ. राधामोहनदास अगरवाल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच राज्य भाजप नेते सुधाकर रे•ाr, सी. टी. रवी, नलीनकुमार कटील, गोविंद कारजोळ, डॉ. सी. एन. अश्वत्थ नारायण, बी. श्रीरामुलू, अरविंद लिंबावळी, सुनीलकुमार, पी. राजीव, प्रीतम गौडा, बसनगौडा पाटील यत्नाळ, भैरती बसवराजू, प्रमोद मध्वराज, चलवादी नारायणस्वामी, प्रतापसिंह, एन. महेश, राजेश जी. व्ही. यांचा समावेश स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये आहे.

2 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हासन जिल्ह्यातील चन्नपट्टण येथून निवडणूक प्रचाराला प्रारंभ करणार आहेत. त्यापाठोपाठ इतर नेतेही राज्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी दाखल होतील. प्रारंभी राज्यात होणाऱ्या पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या दक्षिण कर्नाटकातील मतदारसंघांमध्ये प्रचारावर भर दिला जाणार आहे.

Advertisement
Tags :
×

.