For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसटीच्या रोज 40 बस ब्रेकडाऊन

12:03 PM Dec 23, 2024 IST | Pooja Marathe
एसटीच्या रोज 40 बस ब्रेकडाऊन
40 ST buses break down every day
Advertisement

9 वर्षापूर्वीच्या बस असल्याचा परिणाम
रस्त्याच्या मध्येच बस बंद पडत असल्याने प्रवाशांचे हाल
वर्कशॉपमधील अपुरा स्टापही त्वरीत भरण्याची गरज
कोल्हापूरः विनोद सावंत

Advertisement

एसटीच्या कोल्हापूर विभागात रोज सुमारे 40 बस ब्रेकडाऊन होतात. हा आकडा कधी कमी तर कधी जादाही असतो. सर्व बस 9 वर्षावरील असल्यानेच त्यांच्यामध्ये वारंवार बिघाड होत आहे. परिणामी मार्गस्थ बस बंद पडत असल्याने प्रवाशांचे हाल होतात. नवीन 3500 बस नवीन वर्षात एसटीच्या ताफ्यात येणार आहेत. यानंतर हा प्रश्न निकाली निघेल, अशी अपेक्षा आहे.
एसटीच्या कोल्हापूर विभागाकडे 800 हून अधिक बस होत्या. कोरोनामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. यानंतर नवीन बस खरेदीला मर्यादा आल्या. त्यामध्येच केंद्र शासनाने 15 वर्षावरील वाहने स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला. याची अमंलबजावणी शासकीय वाहनांपासून करण्यात आली. यामुळे एसटीच्या 15 वर्षावरील बस स्क्रॅप झाल्या. सध्या 717 बस असून मध्यवर्ती बसस्थानकातील सहा ते सात बस या महिन्यात अखेरीस स्क्रॅप होणार आहेत. शिल्लक बसमधील बहुतांशी बस 9 वर्षावरील आहेत. नवीन एकही बस एसटीच्या कोल्हापूर विभागात नाहीत. (नवीन स्लीपअर आणि ई बस वगळून) त्यामुळे कोल्हापूर विभागातील 12 आगारात रोज सुमारे 40 बस ब्रेकडाऊन होतात. बंद पडलेली बस दुरूस्त करून दुसऱ्या दिवशी मार्गस्थ केली जाते. दरम्यान, चालु बस बंद पडल्याने दुसरी बस येईपर्यंत प्रवाशांची गैरसोय होते. कोल्हापूरातून बसने इचलकरंजी, सांगली, गारगोटी, गडहिंग्लजला अपडाऊन करणाऱ्याची संख्या जास्त आहे. बस बंद पडल्याने कर्मचारी वेळेवर कामावर पोहोचू शकत नसल्याने त्यांचा पगार कपात होतो. व्यावसायिक तसेच विद्यार्थींनाही ब्रेकडाऊनच फटका बसतो.

सीबीएस वर्कशॉपमध्ये 10 कर्मचाऱ्यांची आवश्यकता
मध्यवर्ती बसस्थानक वर्कशॉपमध्ये 95 कर्मचारी असून बसच्या तुलनेत अपुरे आहेत. इतर बसस्थानकाच्या तुलनेत या ठिकाणी प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. तत्काळ कारगीर आणि कारगिर क असे प्रत्येक 5 जण घेणे आवश्यक आहे.

Advertisement

बस या कारणामुळे होते ब्रेकडाऊन
टायर पंक्चर, स्टार्टरमध्ये बिघाड, जाईंट तुटणे, प्रेशर लिकेज, इंजिनमध्ये बिघाड, वायरींगमध्ये बिघाड

सर्व बसेस 9 वर्षापूर्वीच्या आहेत
मध्यवर्ती बसस्थानकाकडे 125 बस आहेत. यापैकी रोज 3 ते 4 बस ब्रेकडाऊन झाल्याने वर्कशॉर्पला दुरूस्तीसाठी आणल्या जातात. सध्याच्या सर्व बसेस 9 वर्षापूर्वीच्या आहेत. त्यामुळे वारंवार त्यांचा मेंटनन्स येत आहे. नवीन बस ताफ्यात आल्यानंतर याचे प्रमाण नक्कीच कमी येईल.
संकेत जोशी, सहय्यक कार्याशाळा अधीक्षक, सीबीएस डेपो

स्क्रॅप पात्र बस रस्त्यावर
एसटी महामंडळ यापूर्वी 8 ते 9 वर्ष बस वापरल्यानंतर स्क्रॅप करत होती. आता 15 वर्षानंतरच बस स्क्रॅप केल्या जातात. यामुळे 20 लाख किलोमीटर झालेल्या बसचा वापर होत आहे. एकूणच स्क्रॅप पात्र बस रस्त्यावर धावत असल्यानेच वारंवार त्यांच्यामध्ये बिघाड होतो.

एसटीच्या वर्कशॉपमधील स्टाफीची स्थिती
मंजूर पदे -1249
कार्यरत-883
रिक्त-366

मध्यवर्ती बसस्थानक येथील वर्कशॉपमधील स्टाफ
हेल्पर-55
कारगिर प्रमुख -4
कागगिर-15
कारगीर क -6
अधिकारी, कार्यालयीन स्टाप-15

एसटीच्या एकूण बस -717
रोजचे प्रवासी-सुमारे 3 लाख
एक बसचा रोजचा प्रवास -400 किलोमीटर
रोज ब्रेकडाऊन बस -40

Advertisement
Tags :

.