रशियाची 40 लढाऊ विमाने नष्ट
युक्रेनचा दावा : रशियाच्या वायुतळांवर भीषण ड्रोन अटॅक : 17 हजार कोटीचे नुकसान
वृत्तसंस्था/ कीव्ह
युक्रेनने रशियाचे दोन महत्त्वपूर्ण वायुतळ ओलेन्या आणि बेलायावर हल्ला केला अहे. युक्रेनच्या सैन्याने या हल्ल्याकरता ड्रोन्सचा वापर केला आहे. युक्रेनच्या सैन्याकडून करण्यात आलेला हा सर्वात मोठा ड्रोन हल्ला ठरला आहे. रशिया ज्या वायुतळाचा वापर बॉम्ब वर्षाव करण्यासाठी करत होता, त्यालाच युक्रेनने विशेषकरून लक्ष्य केले आहे. या ड्रोन हल्ल्यात रशियाची 40 हून अधिक बॉम्बर्स (बॉम्बवर्षक विमाने) नष्ट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. युक्रेनच्या या हल्ल्यात रशियाचे 17 हजार कोटीचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
या बॉम्बर्सचा वापर रशिया युक्रेनवर बॉम्ब पाडविण्यासाठी करत होता. ही विमाने युक्रेनच्या हवाई क्षेत्रात उ•ाण करत बॉम्ब फेकत होते. आमचे ड्रोन्स रशियाच्या आत शिरून मोठी बॉम्बर्स विमाने म्हणजेच टीयू-95, टीयू-22 आणि महाग ए-50 सारख्या हेरविमानांना नुकसान पोहोचविण्यास यशस्वी ठरले असे युक्रेनच्या सुरक्षा सेवेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
ड्रोन हल्ला बेलाया वायुतळावर झाला, हा वायुतळ रशियाच्या इर्कत्स्कच्या एका दुर्गम क्षेत्रात आहे. तर ओलेन्या वायुतळावरही आग लागल्याचे वृत्त आहे, परंतु अद्याप याची अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. युक्रेनने संबंधित ड्रोन्स प्रथम ट्रकद्वारे रशियात पोहोचविले आणि रशियाच्या भूमीवरून ड्रोन्स हाताळत हा हल्ला घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे.
युक्रेनच्या ड्रोनहल्ल्यात नष्ट झालेली विमाने रशियासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होती. टीयू-95 हे 1950 च्या दशकातील जुने विमान आहे, परंतु अद्याप हे अनेक क्रूज क्षेपणास्त्रs वाहून नेण्यास सक्षम आहे, हे विमान दूर अंतरावरील शहरांनाही लक्ष्य करू शकते. यात जेट इंजिनच्या जागी मोठे फिरणारे प्रोपेलर असून हे दीर्घ पल्ला गाठू शकते.
टीयू-22 एक हायस्पीड विमान असून ते खासकरून क्षेपणास्त्रs वाहून नेऊ शकते. या विमानांच्या हल्ल्यांना रोखणे युक्रेनसाठी सोपे नव्हते. तर ए-50 हे महाग हेरविमान असून रशियाकडे अशी जवळपास 10 विमाने आहेत. याची किंमत जवळपास 350 दशलक्ष डॉलर्स प्रतिविमान आहे.
टीयू-160 हे जगातील सर्वात मोठे बॉम्बवर्षक विमान असुन ते 1980 च्या दशकात निर्माण करण्यात आले होते, परंतु आजही रशियाच्या वायुदलाचे सर्वात धोकादायक विमान मानले जाते. हे अनेक शक्तिशाली क्षेपणास्त्रs वाहून नेण्यास सक्षम आहे.
रशियाची ही विमाने दररोज रात्री आमच्या शहरांवर बॉम्ब फेकत होते याचमुळे त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या या ड्रोन हल्ल्याद्वारे आम्ही बॉम्बफेक कमी करू शकू अशी अपेक्षा असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. रशिया किंवा अन्य देशांकडून अद्याप या हल्ल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. परंतु खरोखरच असे झाले असेलतर युक्रेनचा रशियाच्या वायुशक्तीवरील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जाणार आहे. आमचे ड्रोन यापुढेही झेपावत राहतील आणि प्रत्युत्तरादाख्घ्ल कारवाई जारी ठेवतील असे युक्रेनने म्हटले आहे.