४० फूट उंच फायलिंग कॅबिनेट
जगात अनेक प्रकारच्या अजब गोष्टी आहेत, काही आकारामुळे अजब आहेत तर काही चांगल्या कलाकृती असूनही केवळ अनोख्या ठिकाणी असल्याने अजब अन् प्रसिद्ध आहेत. अशीच एक संरचना अमेरिकेच्या वर्मोंट शहरात आहे. तेथे एका रस्त्यावर खांबाप्रमाणे एक कॅबिनेट उभी आहे, कपाटासारखी ही गोष्ट ज्यात कागदपत्रे ठेवण्यासाठी अनेक कप्पे असतात. माणसाची उंची कमाल 6-7 फूट असूनही हे कॅबिनेट पूर्ण 40 फूट उंच आहे. परंतु आता ही कॅबिनेट अत्यंत प्रसिद्ध ठरल्याने ती पाहण्यासाठी लोक ठिकठिकाणाहून येत असतात. बर्लिंग्टनच्या वर्मोंट शहरात ही कॅबिनेट एखादी प्रतिकात्मक इमारत किंवा मीनार नाही. तर चांगल्याप्रकारे वापरात आणता येऊ शकणारी कॅबिनेट आहे. यात एकूण 38 कप्पे आहेत. 2002 साली स्थानिक कलाकार ब्रेन अल्वारेजने याची निर्मिती केली होती. यातील 38 कप्पे हे अल्वराजने एका स्थानिक प्रकल्पावर काम करताना केवळ पेपरवर्कच जमा करण्यासाठी लागलेल्या 38 वर्षांइतकेच आहेत.
एका इमारतीशी कनेक्शन
हे सर्वकाही एक बिल्डिन साउथर्न कनेक्टरशी संबंधित आहे. 1965 मध्ये या इमारतीच्या निर्मितीचा प्रस्ताव करण्यात आला होता आणि ही कॅबिनेट याच इमारतीच्या निर्मितीच्या प्रकल्पातील विलंबाचे प्रतीक आहे. या कॅबिनेटच्या कप्प्यांना वेल्डिंग करत याची निर्मिती करण्यात आली होती. 2020 मध्ये या कॅबिनेटच्या आसपास काही निर्मितीकार्ये झाली होती. याचमुळे याला स्वत:च्या स्थानापासून 100 फूट अंतरावर बर्लिंग्टनच्या फ्लाइन अॅव्हेन्यू 208 वर 10 फूटांच्या नव्या चबुतऱ्याच्या ठिकाणी हलविण्यात आले होते. आता हे जगातील सर्वात उंच फायलिंग कॅबिनेट म्हणून ओळखले जाते आणि हे आकर्षणाचे मोठे ठिकाण देखील ठरले आहे. याची निर्मिती नोकरशाहीच्या वर्तनामुळे वैतागून करण्यात आली होती. नोकरशाहीमुळे एका इमारतीची निर्मिती अनेक वर्षांपर्यंत टाळण्यात आली होती. यात एकूण 38 कप्पे असले तरीही सर्व एकाच आकाराचे नाहीत. तर यात सर्व कप्पे केवळ 11 वेगवेगळ्या आकाराचे आहेत.