देवालाही नाही सोडले ; पिंगुळी संत राऊळ महाराज समाधी मंदिरात चोरी
४ अज्ञात चोरटयांनी मंदिरातील फंड पेट्या फोडल्या; चांदीची मूर्तीही लंपास
कुडाळ
पिंगुळी येथील प . पू संत राऊळ महाराज यांच्या समाधी मंदिरात शुक्रवार दिनांक ३ जानेवारी रोजी पहाटे पावणे ३ वाजण्याच्या सुमारास आलेल्या ४ अज्ञात चोरटयांनी चोरी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे . चोरटयांनी चांदीची मूर्ती व फंड पेटी तसेच प पू विनायक अण्णा महाराज यांच्या समाधी मंदिरातील चांदीची दत्ताची मूर्ती व फंड पेटी फोडून चोरी केली असून दोन फंड पेटीतील सुमारे 30 हजार रुपये तसेच सुमारे १३ किलो वजनाच्या दोन चांदीच्या मूर्ती पादुका चोरट्यांनी चोरून नेल्या. या चोरीच्या घटनेने पिंगुळीसह कुडाळ मध्ये एकाच खळबळ उडाली आहे. चारही चोरटे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत . घटनेची माहिती मिळताच कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि टिम पिंगुळी मठात दाखल झाली असून श्वान पथक तसेच ठसे तज्ञही दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे .