महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बंबरग्यातील महिलेच्या बॅगमधील 4 तोळ्यांचे दागिने लंपास

06:43 AM Sep 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सोनोली येथे माहेरी जाताना बसमध्ये चोरी

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

बसमधून प्रवास करताना बंबरगा (ता. बेळगाव) येथील एका महिलेच्या व्हॅनिटी बॅगमधून 40 ग्रॅमचे दागिने अज्ञातांनी पळवले आहेत. गुरुवारी दुपारी ही घटना घडली असून कॅम्प पोलीस स्थानकात शनिवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

बंबरगा येथील सावित्री बळवंत कोले यांनी फिर्याद दिली आहे. दि. 12 सप्टेंबर रोजी सोनोली येथील आपल्या माहेरी जाण्यासाठी सावित्री बसमधून चन्नम्मा सर्कलपर्यंत आल्या. तेथून ऑटोरिक्षातून धर्मवीर संभाजी चौकपर्यंत येऊन पोहोचल्या. दुपारी दीड वाजता त्यांना बेळगुंदी बस मिळाली.

बसमध्ये बसल्यानंतर कंडक्टरने तिकिटासाठी विचारणा केली. तोपर्यंत बस गणेशपूरपर्यंत पोहोचली होती. सावित्री यांनी आपल्या व्हॅनिटी बॅगमध्ये हात घातला, त्यावेळी बॅगमध्ये ठेवलेले 30 ग्रॅमचे गंठण व 10 ग्रॅमची चेन असे सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीचे दागिने अज्ञातांनी पळविल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या अंगावरील व बॅगेतील दागिने पळविण्याच्या घटना वाढल्या आहेत. ऐन सण-उत्सवाच्या काळात चोऱ्या, घरफोड्या, चेनस्नॅचिंगबरोबरच बाजारपेठेत व बसमध्ये महिलांच्या बॅगमधील दागिने व रोकड पळविणे, मोबाईल पळविण्याचे प्रकार वाढले असून गुन्हेगारांनी पोलीस दलासमोर तपासाचे आव्हान उभे केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article