कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेच्या अंतिम फेरीत 4 शिक्षकांच्या नवोपक्रमांची निवड

04:29 PM Feb 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सिंधुदुर्गातील  गणेश नाईक ,सुनिल करडे ,विद्या गुरखे, शैलजा मातोंडकर यांचा समावेश

Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (पुणे) अंतर्गत संशोधन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ च्या अंतिम फेरीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन शिक्षक व दोन शिक्षिकांच्या अशा चार नवोपक्रमांची निवड करण्यात आली आहे. यात प्राथमिक गटातून कै रायसाहेब डॉ रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ चे पदवीधर शिक्षक गणेश भिकाजी नाईक व जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सांगेली सावरवाडचे पदवीधर शिक्षक सुनिल परशराम करडे तसेच पूर्व प्राथमिक गटातून विद्या संतोष गुरखे आणि शैलजा सगुण मातोंडकर यांच्या नवोपक्रमांचा समावेश आहे.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, (पुणे) अंतर्गत संशोधन विभागामार्फत दरवर्षी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ही स्पर्धा पूर्व प्राथमिक गट, प्राथमिक गट, माध्यमिक गट, विषयसहाय्यक व विषय साधनव्यक्ती गट, पर्यवेक्षित अधिकारी गट अशा एकूण पाच गटामध्ये स्पर्धा घेतली जाते. प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक गटातून पाच असे एकूण प्रत्येक गटातील १८५ नवोपक्रम राज्यस्तरावर सादर होतात. यातून राज्यस्तरीय तज्ज्ञ परीक्षकांकडून प्रत्येक गटासाठी पहिले १० नवोपक्रम निवडले जातात. या राज्यस्तरीय नवोपक्रमांचे सादरीकरण गुरूवारी ६ फेब्रुवारी रोजी पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत होणार आहे. तर शुक्रवारी ७ फेब्रुवारी रोजी या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे. या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी निवड झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारही शिक्षक व शिक्षिकांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेंद्र कांबळे, संशोधन विभाग प्रमुख डॉ लवू आचरेकर, जेष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता यांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat # sindhudurg #
Next Article