नेमळेत आढळले ४ हत्तीरोग सदृश्य संशयित रुग्ण
सावंतवाडी।प्रतिनिधी
तालुक्यातील नेमळे गावात हत्तीरोग सदृश्य चार संशयित रुग्ण आढळले असून आरोग्य यंत्रणा ऍक्शन मोडवर आली आहे. झारखंड वरून वीट भट्टी कामासाठी आलेल्या २८ कामगारांपैकी ४ कामगार हत्तीरोग सदृश्य संशयित रुग्ण म्हणून आढळून आले आहेत.त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार सुरु असून पुन्हा केलेल्या चाचणी मध्ये हे रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना त्यांच्या गावी पाठवून देणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले . परराज्यातून आलेल्या सर्व कामगारांचे रक्त नमुने तपासण्याचे आदेश शासनाने प्रत्येक गावातील आरोग्य विभागाला दिले असल्यामुळे नेमळेतील या २८ कामगारांचे रक्त नमुने तपासण्यात आले यावेळी २८ कामगारांपैकी ४ कामगार हत्तीरोग सदृश्य आढळून आले आहेत. कोरोना महामारीनंतर हत्ती रोग सदृश्य संशयित रुग्ण नेमळे गावात आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. हा आजार डासांमार्फत पसरत असल्यामुळे नेमळे ग्रामपंचायत आरोग्य विभागाकडून काही भागात फवारणी करण्यात आली आहे .