For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरात 4 भटकी कुत्री,5 मोकाट जनावरे पकडली

01:15 PM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
शहरात 4 भटकी कुत्री 5 मोकाट जनावरे पकडली
Advertisement

महापालिकेच्या पशुसंगोपन विभागाकडून मोहीम तीव्र

Advertisement

बेळगाव : शहर व परिसरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांसह भटकी जनावरे पकडण्याची मोहीम महापालिकेच्या पशुसंगोपन विभागाकडून तीव्र करण्यात आली आहे. सोमवारी 4 भटकी कुत्री पकडून त्यांची रवानगी के. के. कोप्प येथील एबीसी सेंटरमध्ये तर पाच मोकाट जनावरे पकडून त्यांची रवानगी श्रीनगर येथील गो-शाळेत करण्यात आली. महानगरपालिकेच्या हद्दीत भटकी कुत्री व मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. मात्र त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यात महापालिकेला अपयश आले आहे. त्यामुळे नागरिकांतून तक्रारी वाढल्या आहेत. सोमवारी विविध ठिकाणांहून चार कुत्री पकडण्यात आली. तर कोनवाळ गल्ली येथून एक, रविवारपेठेतून दोन, कोतवाल गल्ली आणि सिटी पोलीस लाईन येथून एक अशी एकूण पाच जनावरे पकडून त्यांची रवानगी श्रीनगर येथील गो-शाळेत करण्यात आली.

Advertisement
Advertisement
Tags :

.