‘मुहूर्ता’वर गुंतवणूकदारांची चार लाख कोटींची कमाई
सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
शेअर मार्केटमध्ये शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024 रोजी दिवाळी साजरी करण्यात आली. यादरम्यान एका तासाच्या मुहूर्ताच्या व्यवहारात सेन्सेक्स 335 अंकांनी वाढून 79,724 वर तर निफ्टी 94 अंकांनी वाढून 24,299 वर पोहोचल्यामुळे बीएसईचे मार्केट पॅप 4 लाख कोटी ऊपयांनी वाढले. म्हणजेच या दिवशी गुंतवणूकदारांनी एका तासात 4 लाख कोटी ऊपये कमावले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘मुहूर्त’ व्यवहारांतर्गत शेअरबाजार 1 तासासाठी उघडला होता. या ‘मुहूर्ता’वरील व्यवहारात नेहमीप्रमाणेच बाजाराने आपला नवा विक्रम प्रस्थापित केला. नियोजित वेळेनुसार मुहूर्तावर बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये वाढ दिसून आली. सेन्सेक्स म्हणजेच मुंबई शेअर बाजार निर्देशांक 435 अंकांनी वाढून 79,823 वर आणि निफ्टी 111 अंकांनी वाढून 24,316 वर पोहोचला.