For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

4 भारतीय कलाकारांनी पटकाविला ग्रॅमी पुरस्कार

06:50 AM Feb 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
4 भारतीय कलाकारांनी पटकाविला ग्रॅमी पुरस्कार
Advertisement

शंकर महादेवन, जाकिर हुसैन यांचा समावेश :  फ्यूजन बँड ‘शक्ति‘साठी गौरव

Advertisement

वृत्तसंस्था/ लॉस एंजिलिस

ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये भारतीयांनी स्वत:चा ठसा उमटविला आहे. जाकिर हुसैन यांच्यासोबत शंकर महादेवन यांचा फ्युजन बँड ‘शक्ति’ने बाजी मारली आहे. सर्वोत्कृष्ट ‘ग्लोबल म्युझिक अल्बम’ श्रेणीत विजेते ठरलेल्या भारताच्या महान कलाकारांनी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर तिरंगा फडकविला आहे.  ग्रॅमी पुरस्काराच्या ग्लोबल म्युझिक अल्बम आणि ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स या दोन्ही श्रेणीत या भारतीय कलाकारांनी बाजी मारली आहे.

Advertisement

जगातील सर्वात मोठ्या संगीत पुरस्कारांपैकी एक असलेल्या ग्रॅमी पुरस्कारांच sवितरण भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी सकाळी 6.30 वाजता सुरू झाले. जॉन मॅकलॉघलिन, जाकिर हुसैन, शंकर महादेवन, व्ही. सेल्वागणेश आणि गणेश राजगोपाल यांनी एकत्रितपणे तयार केलेल्या ‘शक्ति’ला ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  उस्ताद जाकिन हुसैन यांनी बासरीवादक राकेश चौरसिया यांच्यासोबत स्वत:चा दुसरा ग्रॅमी पुरस्कारही जिंकला आहे. यंदाच्या ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांमध्ये माइली सायरस, डोजा कॅट, दुआ लीपा, बिली इलिश, ओलिविया रोड्रिगो आणि टेलर स्विफ्ट यासारखे अनेक कलाकार सामील आहेत.

आम्ही देव, कुटुंबीय, भारतातील मित्रांचे आभार मानतो. आम्ही भारतीय असल्याचा गर्व आहे. मी हा पुरस्कार माझ्या पत्नीला समर्पित करू इच्छितो, कारण तिच्यासाठी माझ्या संगीताचा प्रत्येक सूर समर्पित असल्याचे उद्गार शंकर महादेवन यांनी पुरस्कार सोहळ्याला संबोधित करताना काढले आहेत.

देशातील प्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे पुत्र राकेश चौरसिया यांनीही ग्रॅमी पुरस्कार स्वत:च्या नावावर केला आहे. त्यांना दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाला आहे. बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीत पश्तो गीतासाठी तर बेस्ट कंनटेम्प्रेरी इन्स्ट्रुमेंटल अल्बमच्या श्रेणीत एज वी स्पीकसाठी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

ग्रॅमी पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेले गीत ‘एबंडेंस इन मिलेट्स’ला नामांकन मिळाले होते, परंतु या गीताला मागे टाकत जाकिर हुसैन यांच्या ‘पाश्तो’ने बाजी मारली आहे. मोदींच्या गीताला ‘बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स’ श्रेणीत नामांकन मिळाले होते. हे गीत पंतप्रधान मोदी आणि भारतीय-अमेरिकन गायक फाल्गुनी शाह तसेच त्यांचे पती गौरव शाह यांनी लिहिले हेते. तर फाल्गुनी शाह आणि गौरव शाह यांनी ते गायिले होते.

ग्रॅमी विजेत्यांची यादी

श्रेणी                                विजेते

बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्स माइली सायरस (फ्लॉवर)

बेस्ट अल्बम            एसजेडए (एसओएस)

बेस्ट परफॉर्मन्स             कोको जोन्स (आयसीयू)

रॅप अल्ब्मा               किलर माइक

सर्वोत्कृष्ट आफ्रिकन संगीत        टायला (वॉटर)

पॉप डुओ/ग्रूप परफॉर्मन्स     एसजेडए, फोबे ब्रिजर्स

म्युझिक व्हिडिओ                   द बीटल्स, एम कूपर

ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स       जाकिर हुसैन, बेला फेक, एडगर मेयर

ग्लोबल म्युझिक अल्ब्मा    शक्ति (द मोमेंट)

रॅपर किलर माइकला 3 पुरस्कार, मग अटक

66 व्या ग्रॅमी सोहळ्यात तीन पुरस्कार पटकाविणारा रॅपर-सिंगर किलर माइकला अटक करण्यात आली आहे. सलग 3 ग्रॅमी मिळविल्यावर रॅपर सिंगर किलर माइकला क्रिप्टो डॉट कॉम एरिनामध्ये लॉस एंजिलिस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 48 वर्षीय किलर माइकला बेस्ट रॅप परफॉर्मन्स, रॅप साँग आणि रॅप अल्बमसाठी तीन ग्रॅमी पुरस्कारांद्वारे गौरविण्यात आले आहे. त्याचा पहिला पुरस्कार ‘सायंटिस्ट्स अँड इंजिनियर्स’साठी बेस्ट रॅप परफॉर्मन्ससाठी होता, या गीतालच बेस्ट रॅप साँगचा पुरस्कार मिळाला आहे. किलर माइकला यापूर्वी 2003 मध्ये द होल्ड वर्ल्डसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता.

Advertisement
Tags :

.