For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयएफएस अधिकाऱ्याच्या घरात मिळाले 4.5 कोटी

07:00 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयएफएस अधिकाऱ्याच्या घरात मिळाले 4 5 कोटी
Advertisement

देहरादून: वनभूमी घोटाळ्याप्रकरणी उत्तराखंडचे आयएफएस अधिकारी सुशांत पटनायक अडचणीत आले आहेत. ईडीने बुधवारी त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती, ज्यात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम हस्तगत झाली आहे. पटनायक यांच्या घरात ईडीच्या कारवाईदरम्यान 4.5 कोटी रुपये हस्तगत झाले आहेत. तर 34 कोटी रुपयांच्या संपत्तीचे दस्तऐवज प्राप्त झाले आहेत. पटनायक यांच्या घरात रोख रक्कम मिळाल्यावर ईडीच्या पथकाला नोटा मोजणारे यंत्र मागवावे लागले. त्यांच्या घरात काही लिफाफे मिळाले असून त्यात रोख रक्कम होती, ज्यावर काही आयएफएस अधिकारी आणि रेंजर्सच्या नावांचा उल्लेख होता. ईडीने बुधवारी काँग्रेस नेते हरक सिंह रावत यांच्या निवासस्थानीही छापा टाकला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.