लॉस एंजिलिसमध्ये 4.4 तीव्रतेचा भूकंप
06:09 AM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
लॉस एंजिलिस : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातील लॉस एंजिलिसमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी रात्री 1 वाजता 4.4 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. युएस जियोलॉजिकल सर्वेनुसार पहिल्या भूकंपाची तीव्रता 4.7 इतकी असल्याचे म्हटले गेले होते. परंतु नंतर यात सुधारणा करत 4.4 तीव्रतेचा भूकंप झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. भूकंपामुळे त्सुनामीचा कुठलाही इशारा जारी करण्यात आला नाही. तर दुसरीकडे सीरियातही मंगळवारी भूकंपाचे अनेक धक्के जाणवल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Advertisement
Advertisement