For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नारायण मूर्तीच्या नातवाला 4.2 कोटींचा लाभांश

06:17 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
नारायण मूर्तीच्या नातवाला 4 2 कोटींचा लाभांश
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

 भारतीय आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा 5 महिन्यांचा नातू एकाग्र रोहन मूर्तीला त्याच्या 15 लाख समभागांवर 4.2 कोटीचा लाभांश मिळाला आहे. नारायण मूर्ती यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या नातवाला हे समभाग भेट दिले होते. त्यांची किंमत सुमारे 210 कोटी रुपये आहे.

इन्फोसिसने 18 एप्रिल रोजी आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. कंपनीने या तिमाहीसाठी भागधारकांना प्रति शेअर 28 रुपये लाभांश जाहीर केला आहे. त्याचा अंतिम लाभांश रुपये 20 आणि एकरकमी लाभांश रुपये 8 आहे.

Advertisement

निकालानंतर इन्फोसिस 1 टक्के घसरला

इन्फोसिसच्या चौथ्या तिमाहीच्या निकालांच्या घोषणेनंतर, त्याचा स्टॉक सुमारे 1 टक्के घसरला आहे. समभाग 1400 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे.   सुमारे 5 महिन्यांपूर्वी 10 नोव्हेंबर रोजी नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि सून अपर्णा कृष्णन हे आई-वडील झाले. त्यानंतर नारायण मूर्ती यांनी आपल्या नातवाचे नाव एकाग्र ठेवले. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांना कृष्णा सुनक आणि अनुष्का सुनक नावाच्या दोन पणती आहेत. दोन्ही मुली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांच्या मुली आहेत.

इन्फोसिसची स्थापना 1981 मध्ये

इन्फोसिसची स्थापना नारायण मूर्ती यांनी 1981 मध्ये केली होती. तेव्हापासून 2002 पर्यंत ते कंपनीचे सीईओ होते. यानंतर 2002 ते 2006 पर्यंत ते मंडळाचे अध्यक्ष होते. ऑगस्ट 2011 मध्ये, मूर्ती कंपनीतून अध्यक्ष एमेरिटस या पदवीसह निवृत्त झाले. मात्र, पुन्हा एकदा त्यांनी 2013 मध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून कंपनीत प्रवेश केला. यावेळी त्यांचा मुलगा रोहन मूर्ती हा त्यांचा कार्यकारी सहाय्यक म्हणून काम पाहत होता.

Advertisement
Tags :

.