For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेपाळमध्ये कोशी प्रांतात 4.1 तीव्रतेचा भूकंप

06:51 AM Feb 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
नेपाळमध्ये कोशी प्रांतात 4 1 तीव्रतेचा भूकंप
Advertisement

वृत्तसंस्था/ काठमांडू

Advertisement

नेपाळच्या कोशी प्रांतात रविवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप देखरेख आणि संशोधन केंद्राच्या म्हणण्यानुसार, सकाळी 7:31 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल इतकी होती. त्याचा केंद्रबिंदू नेपाळची राजधानी काठमांडूपासून 475 किलोमीटर पूर्वेला असलेल्या संखुवासभा जिह्यातील रितक परिसरात होता. भूकंपामुळे परिसरात घबराट पसरल्याने स्थानिक लोक घराबाहेर पडले. शेजारच्या तापलेजंग आणि भोजपूर जिह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. तथापि, सुदैवाने या घटनेत कोणतेही मोठे नुकसान किंवा जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.

Advertisement
Advertisement
Tags :

.